आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग १
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः|
न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्||
हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत.
मिसळपाव
माननीय महोदय,
सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.
सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं.