लेख
अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!
जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.
श्री - भाग १
"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच"
"पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी."
"तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . "
"मीतू तुला एक सांगू ? "
"सांग ना."
"तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो."
"आपण या विषयावर नको बोलूया आता ."
"मीतू नीट राहशील ना ?
डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.
शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे.
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३
हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली.
युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३
हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली.बाई'को' विकल्यावर
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न.
आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली.
अरेरे, विक्रांत चालली भंगारात
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता.
और नही बस और नही…
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.
मिसळपाव