Skip to main content

लेख

चलती का नाम कोरोला...

लेखक जुईचे फूल यांनी शुक्रवार, 01/11/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, "नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय." तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. "आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं! कधी घ्यायची गाडी?" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला.

हलके व्हा .. !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 31/10/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय.

आली दिवाळी

लेखक जागु यांनी बुधवार, 30/10/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे.

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/10/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला! 1 ६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन! हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे.

कथा एका निवडणुकीची

लेखक हर्षद खुस्पे यांनी बुधवार, 16/10/2013 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग. कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे.

देरसूचा निरोप..........भाग १ - निशाचर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/10/2013 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
१ निशाचर १९०२ साली माझ्यावर एका अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा प्रदेश अत्यंत दुर्दम्य आणि मानवी वस्ती नसल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे नकाशे उपलब्ध नव्हते हे सांगायला नकोच. या प्रदेशाच्या पश्चिमेला आमुर व युसुरी या दोन अवखळ वाहणाऱ्या नद्या आहेत तर पूर्वेला जपानचा समुद्र आहे. व्लाडिओस्टॉकच्या उत्तरेला असलेल्या या प्रदेशाचा इंग्लिश नकाशांमधे ‘ मॅरीटाईम प्रॉव्हीन्स ’ असा उल्लेख आढळतो पण खुद्द या प्रदेशात त्याला युसुरिया म्हणूनच ओळखले जाते, ते युसुरी नदीमुळे.

अव्यक्त…

लेखक मेघनाद यांनी सोमवार, 14/10/2013 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहून बरेच दिवस झाले असल्यामुळे येथे पहिल्या भागाचा दुवा येथे देत आहे. इच्छुक वाचकांनी दोन्ही भाग अनुक्रमे वाचावेत हि विनंती. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आणि गाणं पूर्ण होत न होत तोच तो नाजूक चेहरा पुन्हा राजीवच्या डोळ्यासमोर अवतरला…आता ती सुंदरी तिच्या शुभ्र कपड्यांमध्ये तर अगदी परीवाणी भासत होती. राजीवच्या नजरेस तर आता दुसरं काही दिसतंच नव्हतं.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 08/10/2013 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....