Skip to main content

लेख

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

धाडस ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 14/08/2013 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता.. मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते.. त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू.. खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती.. इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला.. काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला.. वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!! थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली..

शिव श्रावण आणि आपण

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 13/08/2013 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो . नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो. परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.

महाबलिपुरम

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 12/08/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच. महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक.

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 09/08/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच.. निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते.. कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले... आणखी काय लागते..! गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता.. यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली.. टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला.. अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते ! ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली.. पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..

सावल्या ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 07/08/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले.. चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत.. त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या... जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या... काळ्याकुट्ट सावल्या..! त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता..... क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला.. उर नुसता धपापत होता..

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 07/08/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/07/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.

नि:शब्द भावना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 23/07/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या भावना, विचार दु:ख, आनंद, आदर, राग, प्रेम हे शब्दातून व्यक्त करत असतो. प्रसंगी आपण लिहितो, बोलतो, हावभाव करतो आणि आपले विचार व्यक्त करतो, समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण काही भावना अश्या असतात की ज्या शब्दात व्यक्त होत नाहीत. याकरिता परमेश्वराने एक प्रभावी माध्यम दिले आहे आणि ते म्हणजे डोळे. डोळे; हे न बोलून बरेच काही सांगून जातात, याच डोळ्यात निर्माण होणारा ओलावा तर जाणिवेचे सगळ्यात प्रभावी माध्यम. माणूस जन्माला येतानाच मुळी सोबत रडण्याची सनई घेउन येतो आणि आपण या जगात आल्याची जाणीव सर्वांना करून देतो.