Skip to main content

लेख

मंगलयान - पूर्वार्ध

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 21/11/2013 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
उड्डाण पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती.काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.

PLAN F शो मध्ये सहभाग

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 21/11/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या शनिवारी (२३ NOV) सायंकाळी सात वाजता(19.00) माझ्या मुलाखतीचा गुंतवणूक आणी अर्थ विषयक कार्यक्रम DSP BLACKROCK प्रायोजित Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - ५ हा CNBC TV -18 प्रसारित होणार आहे. हाच कार्यक्रम रविवारी(२४ NOV) सायंकाळी आठ(20. 00) वाजता पुनः प्रसारित होईल. याची झलक तू नळी वर उपलब्ध आहे. पण त्याच्या दुव्यावर टिचकी मारली तर तो भलतीकडेच जातो. पण वरील इंग्रजी शब्दच दुवा म्हणून तेथे टाकल्यास आपल्याला तो पाहता येईल. हा कार्यक्रम फारसा उपयोगी नाही असे माझे स्वतःचे मत आहे परंतु त्या कार्यक्रमानंतर देण्यात येणाऱ्या टिप्स चांगल्या असतात.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

नवे व्यवसाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 14/11/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

एफर्टलेस मॅगी नूडल्स !

लेखक साळसकर यांनी गुरुवार, 14/11/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.

बदला

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 10/11/2013 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.

HARRY HARLOW ची माकडं आपल्याला काय शिकवितातं !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी शनिवार, 09/11/2013 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी हार्लो ची थोडी पार्श्वभुमी हॅरी हार्लो या महान मानसशास्त्रज्ञाचा जन्म १९०५ मध्ये फ़ेअरफ़ील्ड काउंटी आयोवा येथे झाला.याने ग्रॅज्युएशन रीड कॉलेज मधुन पुर्ण केल्यावर हा स्टॅनफ़ोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सीटी त मानसशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.हार्लोने सुरुवातीला लेविस टर्मन या प्रसिद्ध संशोधकाच्या हाताखाली उमेदवारी केली. लेविस हा त्या काळात gifted child मध्ये असलेल्या बुद्ध्यांका वर I.Q.

स्त्रीशिल्पे

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/11/2013 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीशिल्पे......... जग निर्माण झाले त्या काळात.... सृष्टी जवळ जवळ तयार झाली होती. त्या श्रेष्ठ निर्मात्याला आढळले की त्याच्याकडील सर्व तत्वे ही सृष्टी निर्माण करतानाच संपली आहेत.

हरवलेला विद्यर्थ

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 04/11/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.