Skip to main content

लेख

मैत्रीच्या नाण्याची दुसरी बाजू --- एक कडवाहट सच

लेखक कुलमयु यांनी गुरुवार, 16/08/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार "मैत्री दिन" म्हणून ओळखला जातो.प्रत्येक वेळी आपण मैत्रीचे गोडवे कायम गात असतो पण त्याच "कडवाहट सच" पण पाहू कधीतरी. मैत्रीतच कधी स्वार्थही दडलेला असतो.(सगळ्याच नाही),मला एक जाहिरात आठवली "जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है " पण सध्या उलट आहे "जो तेरा है वो मेरा है जो मेरा है वो भी मेरा है " अशी सद्यस्थिती आहे .हल्ली सोशल नेट्वर्किंगच्या माध्यामातून बिझनेसच्या फायद्यासाठी मैत्री करतात. त्यात गुन्हा नाही उलट मैत्री मदतच करेल . पण जो त्यात मदत करू शकत नाही म्हणून त्याची मैत्रीची किंमंत शून्य करावी हे चूक आहे. माझ्या अनुभवात मी कायम स्वार्थच अनुभवला.

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.

भ्रमाचा भोपळा

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी रविवार, 05/08/2012 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
* भ्रमाचा भोपळा अध्यापन करणा-या कोणाच्याही आयुष्यात पहिलं लेक्चर हा अविस्मरणीय असाच प्रसंग असतो. विद्यार्थी असतांना आम्ही काही नवख्या अध्यापकांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण आता बाजी उलटली होती. मी "रिसिव्हिंग एन्ड्ला" होतो. ही वेळ माझ्या माझ्यावर कधी ना कधी तरी येणारच होती. फक्त ती अचानक आली इतकंच! * विभाग प्रमुखांनी एक दिवस अचानक बोलावलं आणि ते म्हणाले: "आपले ते हे आज नाहीत. रजेवर आहेत. तू त्यांचं लेक्चर घ्यायचं" झालं! संपलं! इतकं बोलून ते आमच्या एका वरीष्ठ सहका-याशी चर्चेत गुंग झाले.

फंडामेंटल विश्लेषण

लेखक सदानंद ठाकूर यांनी शनिवार, 04/08/2012 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
फंडामेंटल विश्लेषण फंडामेंटल विश्लेषण म्हणजे काय? फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही.

श्यामलादण्डकम् !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी बुधवार, 01/08/2012 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्‍याच वेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले.