Skip to main content

लेख

' ती असताना .......! '

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 24/05/2012 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
" चहाच आदन ठेवलय रे ,तेवढ उकळल्यावर दुध ओतशील का ?" "पोळ्या झाल्यात ...तू डबे भर ना , मी आंघोळीला पळते .." प्रत्येक कामात तिला मी हवा असतो .तिला येत नाही ते काम म्हणून नाही ,तर मी आजूबाजूला ,सतत तिच्या डोळ्यासमोर लागायचो .मी खुपदा चिडायचो ,"एकही काम पूर्ण करत नाहीस ,एक तू केल तर दुसर मी आटपेन ना , तू तुझ्याच कामातली सगळी पडकाम माझ्याकडून करून घेतेस " त्यावर जीवघेणी हास्याची चमचमती मखमल माझ्याभोवती पसरवून ...आपल्या कामासाठी पसार व्हायची . ती असताना , ती सतत माझी सावली बनायची ,नाहीतर माझ्याच सावलीखाली स्वताहाच अस्तित्व जपू पहायची .ती असताना मला कसलीच काळजी नसायची ,माझ घर ,माझी माणसं ,जे आधी मा

पहिले क्रुसेड........... भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/05/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या सगळ्या क्रुसेडमधे ख्रिश्चनांनी फक्त एकच जिंकले. सलादीनच्या युद्धाचा अभ्यास करता करता जमा झालेली माहिती थोडक्यात मांडत आहे. पिटर द हर्मिट योध्यांना जेरूसेलेमचा रस्ता दाखवताना,,, क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९० इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 22/05/2012 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्‍या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला.

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.

मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People)

लेखक किलमाऊस्की यांनी शुक्रवार, 18/05/2012 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture) १६ व्या शतकात स्पॅनिशांनी, आपण जिंकलेल्या मेसोअमेरिकन वसाहतीतल्या लोकांची माहिती गोळा करून दस्ताऐवज बनवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी काही आस्तेक जमातींशी संपर्क साधला. या जमाती स्वत:ला “Tzapotecatl “ असं म्हणत. Tzapotecatl चा अर्थ "People of the place of Sapote".