Skip to main content

लेख

पैठणचा ताजमहाल

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/07/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
पैठणचा ताजमहाल ============== पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 25/07/2012 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

गणपुले काकू

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 24/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.) काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.

आजाद हिंदची रणरागिणी हरपली

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 24/07/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे. हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या.

व्हायरस हंटर

लेखक हारुन शेख यांनी शुक्रवार, 20/07/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला विषाणू संशोधनातला 'इंडियाना जोन्स' म्हणतात. टाईम मासिकाने २०११ साली जगातल्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये त्याची निवड केलेली आहे.'स्टॅनफर्ड विश्वविद्यापीठाचे' सन्माननीय प्राध्यापकपद तो भूषवतो. आणि जिथे आधुनिक युगातील प्रगतीचा आणि सुखसुविधांचा गंधही नाही अशा आफ्रिका आणि आशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत रक्ताचे नमुने गोळा करत फिरत असतो. तीन वेळा त्याला मलेरियाचा जीवघेणा संसर्ग झालेला आहे. तिसर्या वेळचा संसर्ग तर इतका भयानक होता कि साक्षात मृत्युच्या दारातून तो परत आलाय.

सुट्टी आणि मी

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख दुबई महारष्ट्र मंडळाच्या नवरंग या ई-मासिकात प्रकाशमान झाला आहे. तो इथे माझ्या मि.पा. मित्रांसाठी परत प्रकाशमान करत आहे ... चायला लेख आहे का बल्ब?? ;) ] मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे "धिंगाणा" घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते.

' खिडकीमधुन गच्ची तुझी......!'

लेखक जेनी... यांनी शनिवार, 14/07/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची . ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्‍या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या . जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या.