Skip to main content

लेख

घडता घडता घडेल ते घडेल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 13/11/2008 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली.

"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 12/11/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला.

दयाशील आणि परोपकारी हृदय

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/11/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं. नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली. ती मला म्हणाली, माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला.

माझा फिरून- डोकं- वर काढणार्‍यांवर विश्वास होता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 09/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या समोर एक वाडा होता.त्याला अम्ही चांभारवाडा म्हणायचो.प्राथमीक शाळेत शिकण्याची त्यावेळी पण सक्ति असल्याने ह्या वाड्यातली बरीच मुलं आम्ही ज्या शाळेत जात असू त्या शाळेत शिकायला यायची.मी जवळ जवळ सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलो.आणि नंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आलो.माझ्या शाळेत त्यावेळेला ह्या चांभारवाड्यातल्या मुलां पैकी पांडूरंग मोची नावाचा मुलगा होता.तो खेळायला हुषार असल्याने शाळेत तसा प्रसिद्ध होता.त्याची माझी शाळेतली ही ओळख त्यादिवशी खूप वर्षानी परत उजळणीला आली. मी चर्चगेट स्टेशनवर पाचपस्तिसच्या विरार डबलफास्ट गाडीची वाट पहात उभा होतो.

कार्यरत राहिल्याने हिम्मत येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/11/2008 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं. "तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली, "माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं.

"हलो"ह्या शब्दातली क्षमता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 07/11/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले. नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं. नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं, "हा माझा मित्र ,सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केलीअसून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं."हलो" ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाही तरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणा

सेवाभावी (भाग १)

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/11/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या.

डियर हंटींग अमेरिका भाग -२ ( आणि शेवटचा!!)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 04/11/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.>> पहिला भाग इथे वाचा शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते.

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग २ (आणि शेवटचा!!)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 04/11/2008 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो.......>>> पहिला भाग इथे वाचा तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे.

अमेरिकेत मराठी बाणा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 03/11/2008 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता मला अमेरिकेत येऊन एक महिना उलटूनसुध्दा गेला. एवढ्या काळात मी कितीसा अमेरिकाळलो आहे याचा विचार करीत बसलो होतो. इथे आल्यानंतर रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यावाचण्यात मी सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी भाषेचा उपयोग करतो आहे. मुंबईत हा आकडा कधी पन्नासावर गेला नव्हता. जेवणाखाण्यात आमटी, भात, पोळी, भाजी, शेव, चिवडा, पोहे, शिरा इत्यादी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठी पदार्थच असतात. ते सुध्दा मुंबईपेक्षा जास्त झाले. अंगावरचे शंभर टक्के कपडे मुंबईहूनच आणलेले आहेत. घरातले सामान सुमान, अडगळ आणि पसारा इथे कांकणभर जास्तच आहे. कारण आम्हाला इकडच्या वस्तूही हव्यात आणि तिकडच्याही लागतात.