Skip to main content

लेख

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

दोन अनोळख्या मधला एक दूवा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/12/2008 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले , " वेळ जात नसेल तर वाचा" आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण "धन्यवाद" असाच होता." माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट. हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिव

डॉन्याचा सेंडॉफ आणि राकलेट!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 05/12/2008 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
डॉन्याचा फोन आला की त्याचे ५ डिसेंबरला भारतात जायचे नक्की झाले आहे. लगेचच आमचा त्याला जर्मनीच्या चांगल्या आठवणी राहतील असा सेंड ऑफ द्यायचा विचार सुरु झाला आणि 'ती ' बातमी येऊन धडकली. भारतालाच नाही तर जगाला हादरवणारी,सुन्न करणारी.. कोणाचेच चित्त थार्‍यावर नव्हते पण डॉन्याही आम्हाला आता परत कधी भेटेल माहित नव्हते, शेवटी आम्ही २,केसु आणि डॉन्या असे एकत्र जमायचे ठरले. जेवायचा बेत काय करावा? विचार करत होते पण गोडाधोडाचं तर खाण्याची कोणाची मनःस्थितीच नव्हती. त्यात इथे हिमवर्षा आणि कडाक्याची थंडी असल्याने साहजिकच 'राकलेट' करायची कल्पना डोक्यात आली.

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 30/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.