Skip to main content

लेख

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

लेखक चेतन१२३प यांनी सोमवार, 22/12/2008 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 14/12/2008 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
या महत्वाच्या विषयावर झालेली चर्चा वाचून चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या विजेसंबंधीच्या ज्ञानावरला गंज थोडा झटकला गेला. त्यातल्या क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो.

बंगालच्या वाघिणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/12/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले. सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे "बळी'

लेखक अन्वय यांनी शनिवार, 13/12/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या, पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हा काही मुंबईतील पहिला हल्ला नव्हता; परंतु या वेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित जीवनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे यापूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांपेक्षा ही घटना समाजमनावर अधिक तीव्रतेने आदळली.

रामदुलारीला राग का आला?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/12/2008 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली. त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा. भाऊ पुढे म्हणाला, "बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जर

इरफान हुसैन

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 09/12/2008 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.