Skip to main content

लेख

तुला माहित आहे ?

लेखक शितल यांनी सोमवार, 09/06/2008 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुला माहित आहे तु कधी गोड दिसायचीस मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! तुला माहित आहे तु कधी रूसायचीस तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! तुला माहित आहे तु कधी हसायचीस तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! तुला माहित आहे तु कधी जळायचीस तुझ्या मैत्रिणीला मी गाडीवरून घरी सोडायचो तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !! तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
Taxonomy upgrade extras

राजवाड्यांचे शहर

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 08/06/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे.

बाबा...

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 05/06/2008 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
फादर्स डे च्या निमित्ताने... १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो. माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी?? आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले.

इन्फोसिस कँपस

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/05/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे.

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/05/2008 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प

मुंबई ते मैसूर

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 26/05/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता.

औट घटकेचा पाहुणा...

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/05/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच. तर झालं असं.... आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली.