Skip to main content

लेख

तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

लेखक नि३ यांनी शुक्रवार, 09/05/2008 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात.

प्रेमाची स॑ध्याकाळ

लेखक शितल यांनी गुरुवार, 08/05/2008 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राच्या उसळणार्‍या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्‍यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्‍या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्‍यावर एक म॑

बोंबील आख्यान !!!

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 06/05/2008 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विनंती: "मासे तुमचं अन्न असेल" किंवा "मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल" तरच कृपया हे वाचावे. -- आज्ञेवरून !!! --------------------------------------------------------------------- झर्र…झर्र…झर्र…झर्र… ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता "I got bombeel !" कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या.

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/05/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

आवाज

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 01/05/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

प्रतिमा सृष्टी

लेखक मन यांनी मंगळवार, 29/04/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

संवयी

लेखक हेरंब यांनी शुक्रवार, 25/04/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल. सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर.