Skip to main content

प्रकटन

मैथिली

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/04/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं. हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं. " हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच. "कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय? तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली.

आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 18/04/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी.. HealthApps ‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल.

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 16/04/2016 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात .

मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 15/04/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.

सांधीकोपरं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 14/04/2016 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं. सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी. उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

माझी पण मिपा सूक्ष्मकथा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 13/04/2016 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती. -------------------------------------------------------------------- -- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला.. -- आले मोठी आमची बाजू घेणारे -- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले. -- आज काय टाकू? -- पुचुपुचु

'सव्वा सहा' (लघू कथा)

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 13/04/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे चोळत चोळत उठलो, आज गजरच झाला नाही, की ऐकु आला नाही!? कदाचित टीवी बघता बघता हॉल मध्येच सॉफ्यावर आडवा झालो असेन, स्वतःशीच बडबड करत तब्बल अर्धा मिनिट सॉफ्यावर लोळत होतो, तेवढ्यात डोक्यात वीज चमकली >आज ओफ्फिसचा पहिला दिवस त्यात पावसाळा, ह्या पावसाळ्याच्या आईचा घो! नको तेव्हा नको तिथे धो-धो पडत असतो, मला त्याचीच काळजी जास्त, ताडकनी उठलो...

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/04/2016 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली. नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं.

साईनफेल्ड/seinfeld (1989-1998)

लेखक येडाफुफाटा यांनी बुधवार, 06/04/2016 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
साईनफेल्ड(1989-1998) काल एव्हरीबडी लव्हज रेमंड च्या लेखनानंतर दुसऱ्या काही sitcoms आठवल्या ज्यांना टाळून अनेक अमेरिचनां चे तरुणपण अपुरेच राहील. भारतात देखील प्रचंड लोकप्रिय असणारी सीटकॉम म्हणजे फ्रेन्डस्/FRIENDS. आजही फ्रेंड्स या मालिकेची पारायणे/ बिंज वाचिंग करणारे भरपूर लोक्स आहेत. खास करून 20 ते 45 वयातला गट. पण फ्रेन्डस् उत्तम आहे यात तिळमात्र शंका नाही. अस्मादिकांनीसुद्धा त्याचे 22 एपिसोड्स × 10 सीझन्स अशी 10 एक वेळेस तरी रिव्हिजन मारली आहे. इतकी कि त्यातील एपिसोड्स मधील कोणते पात्र कोणते वाक्य बोलते हे ठामपणे सांगु शकतो.