Skip to main content

प्रकटन

कोलाज...

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 05/04/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी. तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं. फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास. ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग. मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख.

"The Best Camera Is The One That's With You"

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 05/04/2016 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणापासूनच कॅमेरा पहात आलोय, माझ्या वडलांना फोटो काढायची खूप हौस, त्यांचे जुने फोटो अल्बम घेऊन बसलो की २ तास कसे जातात कळतही नाही! 'याशिका ट्वीन लेन्स कॅमेरा', 'याशिका इलेक्ट्रो ३५' (पहिला वाहिला बैटरी चलीत कॅमेरा), '१००० पोलोरोइड' असले विविध प्रकार…पण 'याशिका इलेक्ट्रो ३५' सोडल्यास बाकीच्या दोन्ही कैमेर्याच्या फिल्म्स आता मिळत नसल्यानी 'कलेक्टर्स आयटम' विभागात गेलेले आहेत आता.

एव्हरीबडी लव्हज रेमंड आणि आपण

लेखक येडाफुफाटा यांनी मंगळवार, 05/04/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हरीबडी लव्हज रेमंड नावाची एक अफलातून sitcom विनोदी मालिका आहे. सध्या चालू असलेली सुमित संभाल लेगा हि मलिक हि ह्या मालिकेची सीन to सीन नक्कल आहे. कोणी साराभाई वेर्सस साराभाई मालिका पाहिली असेल तर तीही ढोबळ पणे यावरच बेतली असल्याचे लक्षात येईल. या मालिकेत एका इटालियन परिवारातील त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावाने दररोज होणाऱ्या गमती जमती दाखवल्या आहेत.

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 04/04/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.

काय वजन असतं क्षणांना!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 03/04/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय वजन असतं क्षणांना! आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस! तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, जाऊन बघून ये हं ती नित जात्ये की नाही शाळेत, शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली smile emoticon मी ही तिला पाहुन हसलो… अमृताने सांगितलेला सल्ला पाळला, पण तिचा आतपर्यंत पाठलाग करायची माझी खाज महा

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

पु लं चा वुडहाउस आवडणारे काका

लेखक मन यांनी गुरुवार, 31/03/2016 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज मित्राशी गप्पा सुरु होत्या.कुणीतरी वूडाहाउसचं नाव काढलय. वुडहाउस म्हणजे पी जी वुडहाउस. पुलंवर त्याचा प्रभाव होता म्हणे. पुलंचा फेव्हरिट लेखक होता म्हणे. तर त्या वुडहाउसवरुन आठवलं -- *********************पाच वर्षाचा असतानाचं आठवतय तसं************* आमच्या एका दूरच्या काकांना पी जीवूडहाउस आवडत असे म्हणे. म्हणजे ते रहायला शेजारीच होते. पण नात्यात दूरचे होते. दूरचे लोक वरिष्ठ सरकारी अधिकारी असतील तर त्यांना जवळचे करायचा प्रयत्न होतो. म्हणून सगळेच नातेवाइक त्यांना जवळचे असल्यासारखे वागवत. माझ्या बाबांहूनही बरेच मोठे असावेत वयाने.

पूर्वेच्या समुद्रात - १८

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 30/03/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात - १७ अधिक समानता विशाखापटणमच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत असताना एक दिवस आर्मीचा सुभेदार सोनोग्राफीसाठी आला होता. त्याला(रुग्णाला) कोणताही त्रास नव्हता पण तपासणीत त्याच्या पित्ताशयात खडे निघाले. सुभेदार साहेब राजस्थानात बाडमेरच्या जवळ नियुक्तीवर होते. त्याना मी त्यांच्या तपासणीचा अहवाल दिला. काय आहे ते समजावून सांगितले. त्यावर ते म्हणाले सर मी तर याच्या अगोदर सियाचेनला होतो आणी मला कोणताही त्रास नाही. या खड्यांच्यामुळे मला बढती मिळायला काही अडचण येईल का?

संवाद मनातले

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 30/03/2016 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , हा एक निखळ मनोरंजक धागा उघडत आहे.
मेरे पास मा है
किंवा
कितने आदमी थे ?
असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील.