Skip to main content

प्रकटन

बेण आणि मी - एक ओळख.

लेखक भरत्_पलुसकर यांनी बुधवार, 24/02/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला. "छान!

मावशी... मीनल मावशी

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 22/02/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आईची बालमैत्रीण... पूर्ण नाव मीनल कवळे. लग्ना आधीचं मीनल राउत. मुळची आक्षीची... आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री! लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली... आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े...

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 22/02/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे.

पहाट / सकाळ!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 21/02/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट / सकाळ! - नको पहाटेच म्हाणुयात, किती भिन्न असतात ह्या! कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं! आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही! अश्या खुप पहाट आहेत लक्षात! जास्त करून दिवाळीच्या! तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर! - अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची! बैग रेडी.. कपडे तयार....

इन्टॉलरंस म्हणजे काय हो ?

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 21/02/2016 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
पप्पा इन्टॉलरंस म्हणजे काय हो ? माध्यमात सुरु असलेली चर्चा ऐकून माझ्या मुलाचा मला प्रश्न. अरे इन्टॉलरंस म्हणजे असहिष्णुता..पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखकांच्या मते देशात सध्या जे वातावरण आहे त्याला म्हणतात असहिष्णुता ....मी उत्तर दिले. पप्पा, मी तुम्हाला अवघड नाही तर सोपं करण्यासाठी प्रश्न विचारला आहे. बर सांगतो सोपं करून. आता हे बघ..

पूर्वेच्या समुद्रात - १७

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 20/02/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात - १७ विशाखापटणमला रुग्णालयात काम करत असताना सकाळी १० वाजता बातमी आली कि नौदलाचे किरण हे विमान कोसळले आहे आणि त्याचा वैमानिक मात्र विमानातून बाहेर पडला आहे आणि त्याचा शोध जारी आहे. साधारण एक तासाने त्या वैमानिकाला घेऊन एक रुग्णवाहिका आमच्या रुग्णालयात आली. हा वैमानिक व्यवस्थित शुद्धीवर असून स्पष्टपणे बोलत होता. त्याची प्राथमिक तपासणी झाली तेंव्हा त्याने पाठ दुखते आहे हे सांगितले होते त्यामुळे त्याची रवानगी माझ्या विभागात( क्षकिरण) एक्स रे काढण्यासाठी झाली. हा वैमानिक मराठी होता नाव* संदीप टिपणीस(* नाव बदलले आहे). एक्स रे झाले आणि त्याची फिल्म येईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो.

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/02/2016 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.

'भुकमय बडबड'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 18/02/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या! २००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं!

लेडिज स्पेशल

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 17/02/2016 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवार देउळ दिवस लोअर परेल ठाणे दादर फास्ट-दाद्रर परेल- शेअर टॅक्सी गेल्या पाच वर्षात न चुकणारा कार्यक्रम. मेलवर आजच्या देउळातल्या पाहुण्यांची जळजळीत कहाणी डोक्यात भिनलेली. सर्व दुष्काळी भागातील मुले. सर्व प्रकारची आव्हाने परतवुन लाउन मुंबई च्या सरकारी इंजिनियरिंग आणि नेडीकल कॉलेज मधे प्रवेश घेतलेली. शिष्यव्रुती अर्जाची मुलाखत.