Skip to main content

प्रकटन

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

लेखक तर्राट जोकर यांनी बुधवार, 10/02/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.

पूर्वेच्या समुद्रात --१६

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/02/2016 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात -- १५ अंदमानमध्ये असताना एक गोष्ट लिहायची राहून गेली ती येथे लिहीत आहे. पोर्ट ब्लेअर च्या आसपास गस्त घालत असताना आमच्या जहाजाच्या हेलीकॉप्टरची माणसे/ सामान वर खेचायची मोटर आणि कप्पी याची चाचणी करायची होती.म्हणून पायलट आणि इंजिनियर यांची चर्चा चालू होती. त्यासाठी त्यांना ज्याला चांगले पोहता येत होते असा कोणी तरी सडपातळ माणूस हवा होता . मी तेथेच उभा होतो आणि म्हणालो,"चला मीच येतो." त्यावर दोघे पायलट म्हणाले, "सर, तुम्ही"?

To मितवा, (पत्रास कारण की)

लेखक लाडू. यांनी बुधवार, 10/02/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज आरती याचं “राधे… . सृजन…” वाचनात आलं. आणि मग स्वत:ला थांबवताच आलं नाही. एकतर राधा-कृष्ण आवडतात मला. त्यात इतक सुंदर लिहिलेलं.खरच त्या सगळ्या भागांमध्ये रंगून गेले अगदी. लेख तर निव्वळ अप्रतिम. सगळच्या सगळ तस्स डोळ्यासमोर आलं. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे तुला पाठवली लिंक. मला आवडलेलं साहित्य तुला आवडतच कायम. काही गोष्टींबाबत मतभेद असले [सगळ्यात आधी धुक्यातल चांदण] तरीही राधे आवडेल तुला याची खात्रीच होती. ५ मिनिटात तुझा मेसेज अपेक्षित होता. आणि तू केलासही. पण लेखाबद्दल काहीच न बोलता तू मला अचानकच विचारलस, ‘तुला कोमल रिषभ कळतो?’ आणि मला एक क्षण खरच काही कळल नाही. [कोमल रिषभ कळतो मला.

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

दुकान संभाषण

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 07/02/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लॅश बॅक "कसली अ‍ॅलर्जी"? नाही "निल बाय माउथ"? ओके. "सांगपाचे काम आमी करता रे.वार्डात सँड्विच भाय्रर येता ताजे किदे करपाचे?" खंडुबा ओ.टी मधे प्रोसिजर च्या आधी हायपर.तो तरी काय करणार. पेंटाथॉल मधुन बाहेर आल्यावर उलट्या करताना एखादा कण श्वास नलिकेत जाउन दुर्धर प्रसंग ओढवला म्हणजे? "निमा दुसरी निडल दे. तळवलकर नको" (५०+ सहकारी डॉक्टर) सर नविन दिली आहे-निमा "सर्व नविन धारदा॑र नसते.

आठवणीतल्या बाई!

लेखक पी महेश००७ यांनी रविवार, 07/02/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा : जीवन शिक्षण विद्यामंदिर गाव ः पिंपळगाव बसवंत पागे बाई आणि घोडके बाई.... पहिली ते चौथीच्या काळातील या दोन शिक्षिका माझं आयुष्य समृद्ध करून गेल्या. त्यातल्या त्यात घोडकेबाई मला खूप चांगल्या आठवतात. सुमारे तीस वर्षांपूर्वीचं मला सगळंच काही आठवणार नाही; पण त्यांचं शिकवणं मला अजूनही आठवतं. आता ते धूसर होत चाललंय. मेमरी डिलीट होण्याच्या आत कुठे तरी स्टोअर करावं म्हणतोय.. म्हणूनच मी ते कुणाला तरी सांगतोय. ‘आटपाट नगर होतं’ या वाक्याने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आठवतात. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू... या कवितेची चाल किती छान बसवली होती त्यांनी...!

शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 06/02/2016 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले.

काटा वजनाचा --४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/02/2016 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 02/02/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

'सुका मेवा'

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 01/02/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
'सुका मेवा' Suka Meva पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष ! तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही, वय साठ असून तरुणाला लाजवेल असे, त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही! राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात, सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू.