Skip to main content

प्रकटन

पुणेरी पगडी

लेखक Dinesh Satpute यांनी मंगळवार, 16/02/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात. अगदी कालचीच घटना घ्या.पुण्यात हेल्मेट सक्ती करून वसुली सुरु झाली अन वादविवादांना अस तोंड फुटले कि पुणेकरांनी ऑफिसला जाण्याऐवजी ट्राफिक पोलिसाबरोबर वादविवाद करून पोलिसांनाच टोपी घातली.एकतर पुणेकरांना (दुस्र्यास )टोपी घालण्याची सवय.आज दुसरा कोण

नॉस्टॅल'जीया'

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 16/02/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
नॉस्टॅल'जीया' मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड...

बोबींलचा वास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/02/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (या वेळी ब्लॉग म्हणून माझी एक कथा देत आहे. ‘रोखठोक’ 2015 च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा.) निर्मलाबाई आणि सगुणाबाई या तश्या मैत्रिणी नव्हत्या. बालपणापासूनच्या माहितीतल्या- ओळखीतल्या नव्हत्या, म्हणून वर्गमैत्रीणीही नव्हत्या. दोन्हीही नोकरी करीत नसल्यामुळे कार्यालयातील सहकारी नव्हत्या. निर्मलाबाई आणि सगुणाबाई या दोन्ही आर्थिकदृष्य्या विचार करता वेगवेगळ्या वर्गातल्या होत्या.

आबा... सुपेकर आबा ( भाग १/२/३ )

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 15/02/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
Supekar Aba आबा, सुपेकर आबा (भाग-१) त्यांना 'आबा' म्हणालो कारण त्यांना पाहिले पहिल्यांदा तेव्हा अन्वया (माझी माझी साडे तीन वर्षाची मुलगी) होती कडेवर, मला म्हणाले अरे तुझ्याबद्दल खूप ऐकले आई कडून, आज भेट झाली… आनंद झाला :) ३ महिन्यापुर्वीच आलेत आमच्या '११२ श्रीयोग' मध्ये भाडेकरू म्हणून, घरी मुलगा, मुलगी आणि बायको, मुळचे परभणीचे!

सेकंड ओपिनीयन

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 14/02/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो. "सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले. "धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 13/02/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.

भोजन : रसपरिपोष आणि उत्सव !

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
१. देहभार भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे. आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत. हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय.

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

लेखक जेपी यांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 11/02/2016 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत. ha कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्‍या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे.

आयडीचे डू-आयडीस पत्र

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 10/02/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....