Skip to main content

प्रकटन

सोशल नेटवर्क?

लेखक राजू यांनी बुधवार, 30/03/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.' 'बरं पोट निट साफ होते का?' 'नाही ना डॉक्टर.' 'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.' ' डॉक्टर याने काय होईल?' 'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके. आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा

लिफ्ट

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 28/03/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'लिफ्ट' जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत...

सुधागड - एक 'नाईट ट्रेक'

लेखक हकु यांनी रविवार, 27/03/2016 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : खालील लेख हे एक स्वानुभव कथन आहे. यात कुठलीही कल्पनारम्यता नाही. सर्वसाधारणपणे रात्रीच्या चांदण्यात गड चढून पार करणे ही night ट्रेक ची व्याख्या. आजवरच्या मी केलेल्या इतक्या ट्रेक्स पैकी फक्त २ च वेळा हा असा योग माझ्या वाट्याला आला. पहिला म्हणजे २००४ साली केलेला माहुली आणि त्यानंतर दहा-साडेदहा वर्षांनी केलेला हा सुधागड. पण या ट्रेक ला नाईट ट्रेक म्हणण्यासाठी हे एकच कारण पुरेसं नव्हतं. जितक्या ठळक घटना या ट्रेक मध्ये घडल्या होत्या त्या सर्वांची साक्षीदार होती ती म्हणजे 'रात्र'! आणि म्हणून त्याही अर्थाने घडलेला हा एक नाईट ट्रेक.

हार नही जीत नही जहा प्यार है...

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 26/03/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध ट्रेन येण्याची वेळ झालीच होती. आळस झटकत अनिल तयारीत उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकत असतानाच मोठाली बॅग संभाळत येत असलेल्या त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेल आणि नजरभेट झाली. काही क्षण दोघे थबकले. नंतर स्वतःला सावरत त्याच्या बाजूने निघून ती पुढे गेली आणि काही अंतरावरच उभी राहिली. अनिलला क्षणभर काही सुचलं नाही , त्याने अस्वस्थ होवून पुन्हा एकदा तिच्या दिशेनं पाहिलं. शंकेला काही वाव नव्ह्ताच ..निशा.. हो, निशाच होती ती.

अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.०

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
P1 माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;) एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली.

सु.शिं.चे मानसपुत्र

लेखक अजिंक्य विश्वास यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन. २ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली) आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा) हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे. चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून- कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-!

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 25/03/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून.

छोटी राज्ये

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 25/03/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
. महाराष्ट्रामधे गेले काही दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे छोटी राज्ये. वेगळी राज्ये, छोटी राज्ये या मुद्यावर अणेंची सोपी विकेट घेण्यात आली. पण एक लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अणेंवर जबाबदारी टाकून उपयोग नाही अटलजींच्या काळातच ३ नवी राज्ये अस्तित्त्वात आली होती.

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस

लेखक विवेक ठाकूर यांनी मंगळवार, 22/03/2016 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम. मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही.