Skip to main content

प्रकटन

नवीन वर्ष!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 03/01/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्ष! नवीन वर्षात काय नवीन असणारे! प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!! काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं, पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात, तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात! कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो, कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड' हे सर्व एक आठवड्या पासून एक महिन्यापर्यंत लोक्स टिकवतात, मग फेब्रुवारी उगवतो, उत्साह हळू हळू मावळत जात असतो, मे पर्यंत ७०% लोकांच्या नकळत ते सर्व 'रजोल्युशन'चे समीकरण साफ बदलले/विसरलेले असतात. मग नोव्हेम्बर येतो...

विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 02/01/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए.

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/01/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

लेखक सुधीर वैद्य यांनी गुरुवार, 31/12/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे: प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते. काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो. ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन...!

लेखक psajid यांनी बुधवार, 30/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेलं काव्य अशी वैशिष्ट्य असणाऱ्या महाकवीने वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले.

मेघनाद साहाः खगोलशास्त्राचे प्रणेते

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 28/12/2015 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
मेघनाद साहाः खगोलशास्त्राचे प्रणेते
डॉ. सुबोध मोहंती
http://www.vigyanprasar.gov.in/scientists/saha/sahanew.htm

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१२२०

खुर्ची

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 23/12/2015 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस. दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त. कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते. "वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले." सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली. "आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत." ग्रेगने आपला ग्लास उंचावला! "ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!" ग्रेगने मनिषकडे बघितले! मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला. "तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!" आर.एम.

स्प्लेंडर कंट्री : दि अल्टीमेट डेस्टिनेशन

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 20/12/2015 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
(पुण्याजवळच्या एका रम्य रिसॉर्टची सदस्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.) परवा सकाळी वॉटस-अपवर अभिनंदनाचा मेसेज वाचला आणि कळलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. अधुनिक युगाला धन्यवाद देत म्हटलं, चला थोडक्यात वाचलो ! अर्धांगिनी नेहेमी प्रमाणे `बघू कधी लक्षात येतंय' अशा मूडमधे स्वयंपाकघरात काही तरी टिपी करत होती. तिला म्हटलं, `आज तुला एक मस्त ऑफर आहे'. `काय?' `चल स्प्लेंडर कंट्रीला जाऊ'. इतक्या स्पाँटेनियस ऑफरला तितकीच उत्साहवर्धक दाद मिळण्याची शक्यता वैवाहिक जीवनात तशी कमीच . पण तिचे अनेकविध सांसारिक प्रश्न, बुद्धिबळाच्या एंडगेमासारखे फटाफट सोडवून, शेवटी होकाराची विजयश्री खेचून आणली.