Skip to main content

प्रकटन

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

लालवानी... विजय लालवानी

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 21/11/2015 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
लालवानी... विजय लालवानी माझा बॉस होता, मी एवरेस्ट ब्रँड सोल्युशन्स मध्ये जेव्हा रुजू झालो, काही महिन्यांतच विजयच्या ग्रुप मध्ये शिफ्ट झालो. एक नम्बर बोलबच्चन! रेतीला ही सोन्याच्या भावात विकण्या इतपत तगडा आत्मविश्वास... आणि त्यात कमालीचा खडूस! माझी पहिली वाहिली नोकरी, २००५ची वेळ... एवरेस्ट ब्रँड सोल्युशन प्रा.लि. मुंबई. तिथे रुजू झाल्या नंतर ६महिन्यांनी प्रभादेवीच्या कार्यालयातून जेव्हा आम्ही नवीन सांताक्रूझच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत झालो तेव्हा त्याला बंद खोली असलेली स्वतंत्र खोली मिळाली आणि त्याला आमच्या दंग्यापासून सुटका मिळाली!

फरक

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 21/11/2015 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ चे सात वाजले होते. गावदेवी ला ठेवलेली स्कुटर घेऊन वर्तक नगर ला जायचे होते. वळणावर अंधार. जो काय प्रकाश होता तो दुकानांच्या रोषणाईचा. वळणावरच्या दुकानाचा बोर्ड. त्यावरची जाहीरात उठुन दिसत होती. अंधारामुळे अगदी हाईलाईट मधे. म्युनिसिपालीटी बरोबर सेटींग, सुत, दोरा, रश्शी नक्की... जाहीरात वाचली. "कमी वजनाचे एक ग्राम सोन्याचे फोर्मीग (का फॉर्मिंग) दागिने. फरक नाही पडल्यास ३० दिवसात पैसे परत" ...... फ्लॅश बॅक लग्नाला ५ वर्षे झालेली. अक्षय त्रुतियेच्या दिवशी बायकोने हातात अंगठी दिली. नवरत्नाची. " आईने दिलीय". वा. वा. वा. दहाव्या ला नउ का? " ३० दिवसात फरक पडेल असे म्हणाली" असे का?

यक्षप्रश्न

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. गर्द जंगलात निरुद्देश भटकताना पाणी दिसले, तेव्हा त्याच्या काठाशी नकळत विसावले मी. पापणीच्या आतल्या पाण्याला अचानक बाहेरच्या पाण्याची ओढ. मी ओंजळ पुढे करताच कोठूनसा धारदार आवाज आला: “माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याविना पाण्याला स्पर्श करू नकोस. अन्यथा प्राण गमवावे लागतील.” २. महाभारतातील कूटप्रश्न विचारणाऱ्या यक्षाची कथा वाचली होती मी फार पूर्वी, बहुधा त्याचाच वंशज असणार हा! पण आता अशा या सैलावलेल्या क्षणी कोण माथेफोड करणार? आणि ते करून ना काही सिद्ध करायचे होते, ना काही साधायचे होते. प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे, पण ते उगाच दुसरे कोणी म्हणते म्हणून विनाकारण उधळून देणेही शहाणपणाचे नाही.

चहावाल्याचे पंख.....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 19/11/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

पुण्यवंतांची स्मारके आणि वाद घालणारे आपण करंटे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 18/11/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिक्स्लेमरः सदर लेख कोणत्याही जात, धर्म, पंथ, राजकिय पक्ष, विचारसरणी विषयी किंवा त्या विरूद्ध भाष्य करीत नाही. लेखातील विचार केवळ लेखकाचे वैयक्तीक आहेत. लेखकाची सामाजिक वागणूक आणि विचार या लेखात आलेल्या विचारसरणीस अनुसरून असतीलच असे नाही. साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. (संदर्भः "किपलिंगच्या शोधात.." ओंकार करंबेळकर, मंथन पुरवणी, दै. लोकमत) बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान घेण्याचा मार्ग मोकळा - दै. सकाळ महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक - दै.

दोन वेडे !

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 16/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र झाली होती. विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता. मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती. "मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला. "अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत." "येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही." "विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही." "मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर." मार्कचा आवाज कंप पावत होता. "मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं." कोण ? सिकंदर ?" "नाही, सर आर.एम.

गुन्हा - 'तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक'

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 16/11/2015 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात खुप खटल्यांना समोरा गेलो, खुप आहेत, अजुनही चालू आहेत, पण हे अपराध... नाही हो, कोण असतो परफेक्ट मला सांगा. माझ्या वरचा एक नेहमी ठोकला जाणारा आरोप म्हणजे 'समीर फार तोंडातल्या तोंडात + फ़ास्ट बोलतो' मी मान्य केलं, कशाला कोर्ट कचेरी!? आपलं आपल्यात बघून घेउ ना...

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

लेखक मोदक यांनी सोमवार, 16/11/2015 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर.. आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली. ...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या.