Skip to main content

प्रकटन

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

लेखक भानिम यांनी मंगळवार, 08/12/2015 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या लेखांच्या लिंक्स - भाग १ - http://www.misalpav.com/node/33804 भाग २ - http://www.misalpav.com/node/33845 भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873 भाग ४ - http://www.misalpav.com/node/33927

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

राजेंद्र चोल (पहिला) याने दक्षिण भारत आणि उत्तर-पूर्व भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली हे आपण मागील भागात वाचले.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 08/12/2015 00:14 या दिवशी प्रकाशित केले.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

धूसर जगात.....!

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 02/12/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
धुकं फार पडलयं. झाडांचे शेंडे त्यातून वरती डोकावतायत. गर्द हिरव्या डोंगरावर हे पांढरट धुकं अधुन मधून पसरलेलं. मी डोंगराच्या माथ्यावर ऊभा आहे. अगदी ऊंच. खाली पसरत गेलेल्या दऱ्याखोऱ्या मी निरखून बघतो. लांबवर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातील धबधबे पाहून मी हरवून जातो. एखादी वाऱ्याची झुळुक अंगावर शहारे ऊमटवून जाते.हा डोंगर चढताना माझी फारशी दमछाम झालेली नसते. या आल्हादायक वातावरणात मी एका दगडामागे लपतो. आणि दूर एखाद्या पायथ्याशी झाडांची हालचाल नजरेने टिपतो. माझ्या हातात रायफल असते. आणि तिचा निशाणा त्या हालचालींवर असतो. एक डोळा बारीक करुन मी नेम धरतो. मला फारसं काही दिसत नाही.

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

लेखक भानिम यांनी सोमवार, 30/11/2015 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या लेखांच्या लिंक्स - प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग १ - http://www.misalpav.com/node/33804 प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग २ - http://www.misalpav.com/node/33845 प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ४

लेखाच्या मागील भागात; प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबर आपण ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया असा प्रवास करत विएतनामपर्यंत येऊन पोहोचलो

लंगोटनगरी पोपटराजा.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
लंगोटनगरी पोपटराजा वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले, अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले. जितकी विद्वत्ता जास्त, तितके त्यांचे पोपट पंचरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘लंगोटवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि लंगोट उडवणाऱ्या वादळामागे पोपट सावरत मूढ सगळे अमाप धावले. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ .........

अस्तित्व?

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 26/11/2015 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व : भुंड टेकाड आज एकाकी पडलयं. अस्तित्व काय असतं हो? त्याचा वैरान माथा ऊन्हात तळपतो. ऊन्हाच्या झळयात डोळे दिपून जातात. मुसळधार पावसाचा एखादा थेंब त्याच्या वाट्याला येतो. पालवी फुटते आणि क्षणात कोमेजुन जाते. अस्तित्वाच्या पाऊलखुणा सांगत केवळ एक वाळलेलं पातं मागे ठेवते. टेकाडावर गवताच्या काड्यांचा खच पडलाय. वाऱ्याचा एखादा झोत त्यांना तितर बितर करतो. धुळदान पाती दगडा धोड्याखाली चिरडली जातात. कुण्या एकेकाळी फुललेलं जंगल असंच अशक्त होत मातीत गेलं. ही मातीच तेवढी अस्तित्व दाखवत शिल्लक राहिली. मातीलाही अस्तित्व असंतचं तर. कुठुन एखादा कोंब या मातीत फुटतो. भुंडं टेकाड टवकारुन त्याच्याकडं बघतं.

वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 26/11/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल की परवाच वर्तक कुटुंबियांना दुबईतुन भारतात जाउन सहा वर्षे पूर्ण झाली! आणि आज ब्लॉग चाळता चाळता हा लेख मिळाला… वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र' अभिजीत वर्तक. चैत्रा वर्तक. प्राजक्ता वर्तक. सुरुवात करतो अभिजीत पासून... सुरुवातीला झीरो कट... नंतर सचिन टाइप्स... आता जवळपास झाकीर.. किव्वा डिट्टो शंकर महादेवनचा मुलगा, सेम हेयर स्टाइल! फूल दिल से क्यारेक्टर... सीधी बात नो बकवास वाला! आमची ओळख कशी झाली, डोक्याला ताण द्यावा लागतोय, आठवलं... २००८.. नवीनच होतो दुबैत, एका कामा निमित्त मी त्याच्या घरी गेलेलो, ८-९वाजले असतील...

पूर्वेच्या समुद्रात - ११

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 26/11/2015 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १, , , , , , , , , १० पूर्वेच्या समुद्रात - ११ नारकोंडम बेटाची सफर हा भाग मी अगोदरच लिहिला होता.