Skip to main content

प्रकटन

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ३

लेखक भानिम यांनी गुरुवार, 26/11/2015 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या दोन भागांमधून आपण भारतीय संस्कृतीचा प्रसार दक्षिण व पूर्व आशियातील म्यानमार, चीन, कोरिया, जपान, थायलंड इत्यादी देशांत कसा झाला ते पाहिले. आता आपण कंबोडिया, विएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमधील भारतीय संस्कृतीची वाटचाल पाहू. आतापर्यंत आपण पाहिलेल्या इतिहासात, कंबोडियातील राज्यसत्तेला भारताबाहेरील भारतीय संस्कृतीचे अत्यंत गौरवशाली आणि वैभवशाली पर्व असे म्हणता येईल.

आमिर आणि शाहरुख

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/11/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा.

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग २

लेखक भानिम यांनी मंगळवार, 24/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसाराला कशी सुरवात झाली आणि भारतीय शास्त्राध्यापक तिबेटपर्यंत कसे पोहोचले ते पाहिले. या भागात आपण चीन आणि इतर आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला ते पाहुया. हान राजघराण्यातील 'मिंग ती' या सम्राटाच्या आमंत्रणानुसार इ. स. ६७ मध्ये 'कश्यप मार्तंग' आणि 'धर्मरक्षित' हे दोन भारतीय विद्वान चीनमध्ये गेले आणि त्यानंतर नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला आणि ओदान्तपुरी येथील अनेक विद्वान तेथे पोहोचले. ख्रिस्त पश्चात चौथ्या शतकात 'वी' राजघराण्यातील सम्राटाने बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून घोषित केला.

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

ढकलपत्रे....

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 24/11/2015 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल. स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका. मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा ! ------------------ कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार? ------------ आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर--> ..................................... काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे. त्यामुळे आता देखील, 'Window' म्हणजे स्क्रीन वरील एक 'खिडकी' च आहे.

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 23/11/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ?

आठवणी अज्ञातांच्या

लेखक निशदे यांनी सोमवार, 23/11/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.

"प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती"

लेखक भानिम यांनी सोमवार, 23/11/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींच्या निमित्ताने हिंदुत्व, सहिष्णुता, भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचा जगातील प्रभाव इत्यादी विषयांवरती पुन्हा चर्वित चर्वण झाले. प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांची देवाण घेवाण झाली. पण केवळ प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांपलीकडे काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे.

अंतर्यामी ओरीगामी

लेखक नाखु यांनी सोमवार, 23/11/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

अंतर्यामी ओरीगामी

गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .
"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात