Skip to main content

प्रकटन

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

लेखक दिव्यश्री यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/08/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com) #महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

मटण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 19/08/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य मावळतीकडं आला होता . ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो . पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले . तेवढ्यात मागून पक्या आला. पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला . रात्री चांदीच. निघालो दोघे . खमंग वासान डोकं चवताळतय. पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय. दम निघना. देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली . मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता .

हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !

लेखक गोगट्यांचा समीर यांनी मंगळवार, 18/08/2015 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / Tab / Laptop च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते . पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन उचललेल्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली .

फस्ट साईट लव....

लेखक चेतन677 यांनी मंगळवार, 18/08/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्‍यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये

चाळीतील आठवणी भाग ३

लेखक भिंगरी यांनी रविवार, 16/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी भाग १, रविवारची एक शांत सकाळ, सकाळची सातची वेळ, आमच्या कॅम्पमध्ये (आमच्या वसाहतीला कॅम्प' म्हटले जायचे.) कॅम्पाच्या एका टोकाकडून 'कचकच' असा आवाज ऐकायला आल्याबरोबर बाबांनी माझ्या धाकट्या भावाला झोपेतून उठवले. डोळे चोळत भाऊ उठून बसला. दूरवरचा 'कचकच' आवाज त्याच्याही कानावर पडला.आज आपल्या समोर काय वाढून ठेवले हे कळायला त्याला वेळ लागला नाही. नेहमीचीच सवय झाली होती, परंतु नेहमी तो त्या आवाजाला घाबरायचा.

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 15/08/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
. सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ! .

 ...............

.

अमेरीका...अमेरीका...अमेरीका...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 12/08/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक नवी फॅशन आली आहे. काही झालं की अमेरीकेला दोष देवून मोकळं व्हायचं. इराण इराकशी भांडतो. तालिबानी स्वतःच्या देशाशीच भांडतात. यामधे सग्गळा दोष म्हणे अमेरीकेचा असतो. आयसिस बर्‍याच गमजा करते. यामागेही अमेरीकेचाच हात असतो. मानलं काही प्रमाणात असेलही पण....मनात येतं खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का... आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का आझाद मैदानात ...