Skip to main content

प्रकटन

माझी पत्रकारिताः माझे अनुभव

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 23/09/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिताः माझे अनुभव मनाची संवेदनशिलता मरु न देणे आणि सकरात्मकता जपून ठेवणे हे पत्रकारितेतील सर्वात मोठे आव्हान आहे. मागील वीस वर्षाच्या प्रवासात अनेक अनुभवांना सामोरे गेले. प्रत्येक वेळी संवेदनशिलता आणि सकारात्मकतेची कसोटी लागली. पत्रकारितेचे ग्लॅमर भल्या भल्यांना वाहवत नेते. मोहाच्या क्षणी कमजोर न पडता आपले उद्दिष्ट साध्य करणे अवघड असते याचा अनुभव घेताना प्रवाहात टिकून राहणेही आवश्यक असते. अशावेळी प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची किंवा आपल्याकडे दूर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त. माझी पत्रकारिता सुरु झाली त्यावेळचे वातावरण महिलांनी या क्षेत्रात यावे की नाही याविषयीच सांशकतेचे होते.

चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

लेखक खेडूत यांनी बुधवार, 23/09/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी भाग -१ भाग -२ भाग -३ भाग -४ भाग -५ भाग -६ मागील सहा भागांमध्ये आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या काही घडामोडी आणि त्याचं आर्थिक गणित थोडक्यात पाहिलं. सध्या कधी नव्हे तो वाहन उद्योग भारतात फोफावला आहे.

नक्षत्राचं देणं..(शतशब्द कथा ) २.०

लेखक जेपी यांनी बुधवार, 23/09/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १.० http://www.misalpav.com/node/32359 ================================================================================ चालु पंधरवाड्यात पाऊसकाळ चांगलाच झालता.शिवारात वितभर उंचीच पिक डोलत होत. विठ्या आणी त्याची बायका पोर शेतातल्या कामात बुडून गेलते. दिस मावळतीला झुकताना विठ्या तात्याला म्हणाला,"तात्या हे नक्षत्र चांगलच बरसल की रे!." तात्या त्याच्याकड पहात म्हणाला,"पोरा आभाळातील नक्षत्र येतील अन जातील,बरसतील अगर नाही,ती त्यांची मर्जी हाय, पर हि जी माणस हायतन..", विठ्याच्या बायकोपोराकड बोट दाखवत म्हणाला,"हि माणस बी नक्षत्रासारखीच हायती,अन ह्या

श्रीगणेश लेखमाला ६ : कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)

लेखक प्रास यांनी बुधवार, 23/09/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळ - वर्ष १९९२ (ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!) "हॅलो! नमस्कार!" "अरे मी अरुण बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?" "हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..." "अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?" "पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत." "मग आता विचार काय आहे?" "तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला." "अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?" "त्याला जायचं असून काय उपयोग?

श्रीगणेश लेखमाला ५ : माझी पत्रकारिता

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 22/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिता राष्ट्रीय वाहिनीवरील सलमा सुलतान, मराठी दूरदर्शनवरील प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, ज्योस्त्ना किरपेकर, नलिनी सिंग यांच्यानंतर ९०च्या दशकातील बरखा दत्तपर्यंत तमाम पत्रकारांचे आणि वृत्तनिवेदकांचे लहानपणापासून प्रचंड आकर्षण होते. ३१ डिसेंबरला दिल्ली दूरदर्शनवरून सादर होणारा 'अराऊंड द वर्ल्ड' कार्यक्रम असो वा साप्ताहिकी, प्रत्येक कार्यक्रम लहानपणापासून मनावर नकळत पत्रकारितेचे संस्कार घडवत होता.

तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 21/09/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं.

श्रीगणेश लेखमाला ४ : उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 21/09/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.

उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय.

तरुणपणी सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक स्वप्ने पाहिली. म्हणजे अगदी लहानपणी रेल्वे इंजीन ड्रायव्हरपासून कळायला लागल्यावर विमानाचा पायलट ते सैन्यअधिकारी किंवा एअरफोर्स पायलट अशी विविध रोमांचकारी आणि कालसापेक्ष, प्रकृतीनुरूप सतत बदलणारी स्वप्ने पाहिली. पण नियती मला पाहून हसत होती. ती म्हणत होती, 'बेट्या, मला विसरतो आहेस. तुला मीच घडविणार आहे.' प्रथमवर्ष विज्ञानला कॉलेजला दांड्या मारून चित्रपट पाहणे आणि अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष ह्याचा परिपाक म्हणून नापासचा शिक्का बसला. अर्थार्जनाची घाई आणि चालून आलेली संधी पकडून नोकरी सुरू केली.

श्रीगणेश लेखमाला ३: योगशिक्षक

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 20/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेतील इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल; आपण भविष्यात योग शिक्षक बनावे अशी स्वप्नेही मुले किंवा त्यांचे पालक पाहत असतील असे वाटत नाही. मात्र या क्षेत्रात जवळपास २८ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वत:चे आणि इतरांचेही भविष्य घडवण्याची ताकद आहे आणि केलेल्या कामाचे समाधानही आहे असे नक्कीच वाटते.

श्रीगणेश लेखमाला २: यंत्रोपवित

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 19/09/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना माझे आई-बाबा मिपा वाचत नसले, तरीही सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो. कारण माझ्यावर त्यांनी कधीच तू अमुक एकच केलं पाहिजेस अशी सक्ती केली नाही. तुला वाटेल त्या गोष्टीमध्ये तुझं करिअर कर म्हणून त्यांनी मला मोकळीक दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. "बाळा/बाळे, तू मोठी झालीस की कोण होणार?" असा प्रश्न साधारण वयाच्या पाचव्या वर्षीपासून न विचारलं गेलेलं बालक शोधून सापडायचं नाही बहुधा.

श्रीगणेश लेखमाला १: शिक्षणक्षेत्र

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 18/09/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.' मला कोणीही जेव्हा कधी तू या क्षेत्रात कसा आणि कुठून आलास असं विचारतो, तेव्हा माझं हे ठरलेलं उत्तर आहे, आणि ते १०० टक्के खरं आहे. १ मे १९९६ या दिवशी जर माझ्या आईकडे सुट्टे पैसे असते, तर माझं संपूर्ण आयुष्य फार वेगळ्या मार्गाने गेलं असतं. माझी आई मुंबई महानगरपालिकेच्या स.गो.बर्वेनगर, घाटकोपर पश्चिम इथल्या शाळेत शिक्षिका होती आणि १ मे हा नेहमीप्रमाणे त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता.