Skip to main content

प्रकटन

श्रीगणेश लेखमाला, सगळे लेख एकत्र.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 28/09/2015 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही गुणी मिपाकरांचे लेख ह्या "गणेशोत्सवात" वाचायला मिळाले, त्यामुळे प्रथमतः संपादक मंडळाचे आभार. काही लेख मित्रांना आणि मुलांना वाचायला द्यायचे होते.आज ते सगळे लेख एकत्र केले आणि परत एकदा वाचून काढले. वाचता-वाचता, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. हे लेख एकत्र केले तर उत्तम असे वाटल्याने, सगळे लेख एकत्र करत आहे. तसे हे सगळे लेख माझ्या कडे साठवून ठेवले आहेत. पण ज्ञान सगळ्यांना वाटावे, असे वाटल्याने, हा वेगळा धागा काढत आहे. उगाच १० वाचनखूणा साठवण्यापेक्षा, हा एकच लेख साठवला की झाले.

रूपगर्विता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

बारकुले दिवस

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ऊठ बाबा, चुलीतली राख घीऊन दात घास" जख्खड म्हातारी, आज्जी कुठली. "बग माजा कसा भिंगतुय!" सकाळपारी भोवरा फिरवायचा रोजचा पराक्रम. "आये, मी न्हाय जाणार साळंला" खाकी चड्डी पाढरा शर्ट. शेंबुड पुसणारा गबाळा अवतार. "चल रै भावड्या, कालची गणितं सोडवलीका?" दोन वेण्या घातलेली थोरली बहीण. गुडीगुडी. "तायं, मला गाभुळ्या चिच्चा दि की काढुन" वाटेतल्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करत. "पाटीवर बदकाचे चित्र काढा" फळ्यावर छडी ठेवत मास्तरीण.

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 27/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले.

एका अनोळखी प्रदेशात

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 26/09/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

अजून एक कॉफी...

लेखक हैयो हैयैयो यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या पावसाळ्यात एक सकाळ... रिमझिमत होते. हातांत छत्री घेवून निघालों.

एरवी गांवांत सकाळला दूधवाला अन् पेपरवाला सोडले तर इतर कुणाचीच विशेष लगबग नसेल. दुकानेही अजून बंद. अजून कुठे आठच तर वाजत होते. रस्त्यांत अजून कुठे घोळका-गलबला नाही. गांव नेहमीच असे आळसावले असे. पुढे दिवसभरांत इतर अनेक कामे होती, तेमुळे ह्या भेटीकरिता सकाळच उत्तम म्हणत वेळ निवडलो होतो.

छोटे साहेब एका बसस्टॉपवर बैसले होते. मला बघतांच हात करत लक्ष वेधले. ‘हाय्’ म्हणून हस्तांदोलन केले. बोलतांना खांद्यावर हात ठेवले चक्क. (असो..!)

श्रीगणेश लेखमाला ८ : सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग)

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 25/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
उत्पादन अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. शून्य अनुभव पण शिकण्याची व कष्टाची तयारी या जोरावर नक्कीच काहीतरी मिळवू हा विश्वास ठेवत इंटरव्ह्यू देत होतो. अखेर एके ठिकाणी हातात ऑफर लेटर पडले. पोस्ट - ग्रॅज्युएट ट्रेनी इंजीनिअर (मटेरिअल्स). लगोलग रुजू झालो. ट्रेनिंगच्या पहिल्या दहा दिवसात एकेका विभागाची ओळख करून देण्यात आली. कंपनी काय वस्तू पुरवते, कुणाला पुरवते इ. इ. बाबींची व्यवस्थित ओळख करून घेतली. उत्पादन विभागात असेंब्ली कशी होते, काय काय गोष्टी लागतात हे नीट समजून घेतले. कोणत्याही आस्थापनेस एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते.

श्रीगणेश लेखमाला ७ : अनुभवांची शिदोरी

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 24/09/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला. फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी.