Skip to main content

प्रकटन

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 08/12/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिपावर प्रकल्प

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 08/12/2013 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीची "सेमीफायनल" समजल्या जाणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आणि निकालही जवळपास पूर्ण जाहिर झाले आहेत.आता लवकरच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.या निवडणुकांसाठी मिपावर पुढील दोन प्रकल्प चालवायचा माझा इरादा आहे. १. प्रश्नमंजुषा: लोकसभा निवडणुकांवर मी बऱ्यापैकी काठिण्यपातळीचे एकूण २० प्रश्न तयार केले आहेत.

टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 08/12/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पूर्वी एक नोकरशहा ने असा इतिहास घडवलेला आहे. त्यांचे नाव श्री टी एन शेषन . पण शेषन साहेब काही निवडून येउ शकलेले नाहीत. केजरीवाल ना जे यश मिळालेले आहे त्याची दिलखुलास दाद देताना अण्णा हजारे यांची जीभ लटपटते आहे तर केजरीवाल यांची फजिती होणार आहे असे काही लिखित माध्यमाचे संपादक म्हणू लागले आहेत.

गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath

लेखक प्रास यांनी रविवार, 08/12/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच.

एका संस्थेची पन्नास वर्षे...

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/12/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
. तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे. आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

सेन्टी - मेन्टी : वो शाम कुछ ...........

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 07/12/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्‍या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ?

एकमात्र

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई. भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे, घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे.

अधुरि एक कहानी भाग-४

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने पक्याला आपल्या कॉलेज साठी गाव सोडावे लागले.त्यापूर्वी ती आणि पक्या एकदाच भेटले होते,हां पण दोघांच्याही कुटुंबासोबत...पण पक्या जवळ इतके धैर्य नव्हते की तो मनातील तिला बोलू शकेल.तिलाही माहीत होते की याच्या मनात काय आहे आणि यालाही माहीत होते की तिच्या मनात काय आहे !पण कुणी मात्र बोलायला तयार नव्हते. काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत गेला.गाव सोडल्यावर पक्या चे कशात मन लागेना.सारखी तिची अबोल प्रीत त्याला खूणावत् असे.२ वर्षाच्या गॅप नंतर दोघे ही त्याच शहरात पुन्हा एकदा भेटले.तिचे कुटुंब ही आता तिथेच आले होते राहायला.पक्याला आणि तिलाही बरे वाटले.पण मनातील कुणीच काही बोलेना.अबोल प्रेम तसेच सुर

अधुरि इक कहानी भाग-३

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता दिवस जाऊ लागले आणि मग पक्याला हवी ती संधी मिळाली....तिच्या घरी जायची ! संक्रांतीचा तिळ-गुळ द्यायला तेव्हा सगळी मुले-मुली १४जानेवरीच्या सायन्काळी परिचितांच्या आणि गावातील सगल्या शिक्षकांच्या घरी ही जात.पक्याच्या घरीही येत सगळी मुले-मुली.आणि या पेक्षा उत्तम कारण पक्या ला कुठले मिळणार होते? झाले पक्याची सकाळपासूनच तयारी सुरू होती.कुठला ड्रेस आज घालायचा यावर १० वेळा विचार करून झाला होता.केस ही अगदी तेल लावून चोपून कोंबडा बनवून बसवून घेतले होते ठीक ठाक.