Skip to main content

प्रकटन

अरे रे, मन्ना दा गेले!

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 24/10/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
वाईट वार्ता बहुधा खरी ठरते, आताच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मन्ना डे यांचं बेंगलुरु येथे दीर्घ आ़जाराने निधन झाल्याचं वाचलं, खूप वाईट वाटलं. Manna Dey त्याना श्रद्धांजली म्हणून काही गाणी खाली देतोय, वेळ मिळेल तशी भर रसिक घालतीलच.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ४ (www आणि टीम बार्नर्स ली)

लेखक नानबा यांनी बुधवार, 23/10/2013 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबरच त्याच्याशी निगडीत बाकी गोष्टींवरदेखील संशोधन होऊ लागल्यामुळे त्यांचाही वेगाने विकास होऊ लागला होता. इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात वेबसाईट्स चे पत्ते http:// ने सुरू होत असत. परंतु सामायिक डेटाबेस आणि presentation softwares च्या अभावामुळे माहितीच्या आदानप्रदानात बरेच अडथळे येत होते. त्यावर उपाय काढण्यासाठी बरीच संशोधनं चालली होती. टीम बार्नर्स ली या अडथळ्यावर मात करण्यासाठी एका सामायिक वेब पत्त्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती टीम बार्नर्स ली यांनी.

आला वर्दी - एक अवलिया.

लेखक नानबा यांनी मंगळवार, 22/10/2013 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
hj कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे. अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी.

अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.

लेखक गवि यांनी सोमवार, 21/10/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.." खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला. नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं.

संवादिका : १ - मंगल कार्यालय

लेखक प्रास यांनी रविवार, 20/10/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, तो विजुताईंचा मुलगा ना?" "कोण हो?" "अहो तो काय, त्या छोटीला कडेवर घेऊन उभा आहे, तो." "तो होय, हो हो, तो विजुताईंचा मुलगाच नि ती छोटी त्यांची नात." "हं, म्हणजे केलं वाटतं याने लग्न." "छे हो, ती छोटी विजुताईंची नातच पण म्हणजे त्यांच्या मुलीची, ज्योतीची मुलगी." "म्हणजे अजून नाहीच केलंय का याने लग्न?" "हो ना!" "इतका चांगला मुलगा आहे, स्वभाव, शिक्षण, नोकरी. मग करत का नाहीये लग्न?" "कुणास ठाऊक?" "तसं कधी, कुठे प्रकरण वगैरे काही?" "ऐकलं नाही कधी तसं. पण आजकालच्या मुलांचं काय, कसं, ते काही कळतंच नाही.

शैलू

लेखक अक्षरमित्र यांनी बुधवार, 16/10/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : ही व्यक्तीचित्रणे सत्य घटना व पात्रे यांवर आधारीत आहेत. काळ साधारण इ.स. १९८७ ते १९९३ दरम्यानचा आहे. पात्रांची नावे बदलली आहेत. प्रसंगांतील भाषा काही प्रसंगी शिवराळ व अश्लील वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना अशा प्रकारच्या वाचनाची नावड असेल त्यांनी कृपया येथेच थांबावे.) शैलू मी तेव्हा साधारण ५ वी / ६वीत असेन. आमच्या चाळीतच शैलू राहायची. शैलूचा बाप तिच्या लहानपणीच तिच्या आईला टाकून गेला होता. तो कुठे होता, काय करीत होता, जीवंत होता की नव्हता ह्याचा पत्ता शेवटपर्यंत चाळीतल्या बायांना आणि बाप्यांना लागला नाही.

नौदलातील आयुष्य -३

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 15/10/2013 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी अश्विनी या नौदलाच्या कुलाबा रुग्णालयात काम करीत असतानाची गोष्ट आहे. तो मंगळवार होता. एके दिवशी रात्री दहा वाजता मला नौदलाच्या पोलिस स्टेशन वरून फोन आला कि लवकर रुग्णवाहिका पाठवा. मी चौकशी केली तेंव्हा आमच्या दोन रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या.एक रुग्णाला पोहोचवायला आणि दुसरी आणायला गेली होती. इतर दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण त्यात चालक नव्हता(रात्रपाळीला दोन चालक असत). मी तिथे सूचना देऊन ठेवली होती कि रुग्णवाहिका जशी येईल तशीच पोलिस स्टेशन ला पाठवा. पुढच्या दहा मिनिटात परत दोन वेळा फोन आला कि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवा.

फ्री बर्ड्स

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 14/10/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग आयला किती वेळ नुसते उडत रहाणार? हो ना चला रे खाली एखाद्या फ़ांदीवर बसू. फ़ांदी? कसली फ़ांदी? अरे हा म्हातारा अजूनही जुन्या काळात उडतो आहे. त्याच्या काळात म्हणे खाली हिरवीगार जंगले होती त्यांत झाडे होती. झाडांना फ़ांद्या होत्या? च्र्यांग च्र्यांग... आई झाडे म्हणजे काय? फ़ांदी म्हणजे काय? अरे त्या टॊवरवर तो लोखंडी क्रेन पक्षी दिसतोय नां? त्याचे हवेत पसरलेले हात म्हणजे फ़ांदी. च्र्यांग च्र्यांग चल आई.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ३ (ARPANET चा अस्त आणि TCP/IP चा उदय)

लेखक नानबा यांनी सोमवार, 14/10/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ भाग - २ १९६९ मध्ये प्रो. क्लाईनरॉक यांनी ARPANET साठी पहिला संदेश पाठवला आणि इंटरनेट संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यास सुरूवात झाली. ARPA नंतर जगभरातील संगणक अभियंत्यांनी आणखी आधुनिक, जलद आणि जास्त क्षमतेच्या संदेशवहन नेटवर्क्सवर संशोधन सुरू केलंच होतं. १९७२ मध्ये संगणक अभियंता रॉबर्ट काह्न हे DARPA च्या Inoformation Processing Technology Office मध्ये रुजू झाले.

साल्ला यकु....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/10/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे फेसबूकचे पान उघडले. सवईप्रमाणे आज कुठल्या कुठल्या मित्रांचे आणि मैत्रीणींचे वाढदिवस आहेत ते बघीतले. पहिलेच नांव वाचले आणि न विसरता."Happy Birth Day." लिहून मो़कळा झालो. काही माणसांचे काही-काही विचारच असे असतात की, जे चिरकाल टिकतात.हा यकू पण तसाच विचार करायचा.