Skip to main content

प्रकटन

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (५)

लेखक शिवोऽहम् यांनी रविवार, 08/09/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४) ************************************************************************************************ गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला.

फिर मिलेंगे भाईजान..

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 08/09/2013 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेले वर्षभरात बदललेला हा चौथा डॉक्टर. आजाराने पुन्हा उचल खाल्ली होती. बारावीला चांगले मार्क काढले असतेस तर डॉक्टरच बनवला असता तुला, असे आई कित्येकदा बोलायची, अन माझ्याजागी एखाद्या नर्सशीच लग्न का केले नाहीस असे बायको वरचेवर सुनवायची. म्हणूनच का माहीत नाही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यास माझी पहिली नजर नर्सेसवरच भिरभिरते. अगदी आजही भिरभिरत होतीच, हॉस्पिटलच्या आवारात शिरल्यापासूनच. इतरवेळी रोगट वाटणार्‍या वातावरणात बघण्यासारखे एक तेच तर असते. बस्स भिरभिरतच होती नजर, अन अचानक अडकली.

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

विजय आणि भूक (शतशब्दकथा)

लेखक एच्टूओ यांनी शुक्रवार, 06/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे ) या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?" " अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या !

RELIEF ?

लेखक देशपांडे विनायक यांनी गुरुवार, 05/09/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
राजा गेला . म्हणजे आमच्या वर्गातले गेल्या वर्षात सहाजण गेले . त्या आधीच्या वर्षी चार जण . आम्ही आता सुप्यातून जात्यात जायचेच बाकी राहिले ! आपल्यापाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून काय काय करावयाचे याची चर्चा मित्रामध्ये सतत होऊ लागल्या . आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे बायको मनावर घेत नव्हती मी तिच्याआधी जाऊ शकतो असल्या शक्यातावर विचारच करत नव्हती तिचे कसे होणार हा विचार जात नव्हता आणि एक दिवस SMS आला '' वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' ! तिच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या . मंजीरीचे उदाहरण बायकोला मार्गदर्शक ठरू शकते या विचाराने RELIEF मिळाला .

Spanish Cherry !! नाही गं, बकुळ.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 05/09/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीचा फोन ,मामा किती वेळ झाला तुझा फोनच लागत नाही. एवढे अर्जंट काम काय असावे हा तर्क करत असतानाच भाचीचे शब्द कानी पडले.मामा बकूळी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि खारीक च्या झाडाला काय म्हणतात ? दोन्ही प्रश्न ऐकून मी थोडासा हडबडलो ? तुला आत्त्ताच कशाला हवी हि माहिती ,बघून सांगतो असे म्हणताच नाहीरे सई चा प्रोजेक्ट आहे त्यासाठी हवी आहे. आता मलाही राहवेना ५/६ वर्षाच्या मुलीचा प्रोजेक्ट तो काय असणार आणि त्यासाठी आईची धावाधाव. मला सुद्धा पटकन आठवेना.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 04/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 31/08/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

शेत-तळं

लेखक मीराताई यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर दृष्टी टाकत दिगंबर सायकल रेटत होता. रस्तारुंदीच्या कामात जुनीपुराणी झाडं तोडली गेली, तेव्हापासून रस्त्याला थंडगार सावली देणारी त्यांची डेरेदार छत्रंही गेली. एरवी हिरव्याचार शेतांवरून येणारी झुळुक थंडोसा आणायची अन् त्याबरोबरच तो हिरवा, ओला गंधही! पण आता पाहावं तर कालपरवापर्यंत भेगाळल्यासारखी दिसणारी शेतं, ढेकलं उलून आल्यानं केविलवाणी दिसत होती. बांधाबांधावरच्या एकटया दुकटया चिंचा-बाभळी उसासत कशाबशा तग धरून उभ्या होत्या, उद्याच्या आशेवर! उजाड माळरानांवर तेवढेच हिरवे ठिपसे जिवंतपणाची खूण पटवत होते.