Skip to main content

प्रकटन

टबुडी टबुडी जसवंती

लेखक तिमा यांनी शनिवार, 02/11/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.

दिवाळीचे विष्णूपूजन !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 31/10/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली. नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय. अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??! पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं..

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही

लेखक निरु यांनी गुरुवार, 31/10/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही. आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही.

हलके व्हा .. !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 31/10/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय.

मंतरलेले ते दिवस आता फिरून परत येतील का ?

लेखक psajid यांनी बुधवार, 30/10/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
दूरचित्रवाणीवर मोती साबणाची जाहिरात पाहीली ? तीच ती "उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली… " म्हणत पळणाऱ्या मुलाची ! किती छान ना ? जाहिरात फक्त १५ ते २० सेकंदाची मात्र संस्कृतीची आठवण देणारी… आजची दिवाळी बदललेची जाणीव करून देणारी ! किती छान वाटतं नाही सोनेरी इतिहासात पहाण्याला ? आता ते दिवस नाही म्हणून दुःख व्यक्त करत रडत नाही कारण आताचे आधुनिकतेने नटलेले, विज्ञानाचा साज चढवलेले हे दिवस ही वाईट नाहीत मात्र या दिवसांचे एकेक क्षण पकडताना होणारी दमछाक आणि येणारा थकवा मनाला आनंद देण्याकामी एकदम तोकडा पडतो.

अन्याच्या बापाची पार्टी !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/10/2013 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मितान ह्यांचा हा धागा वाचला आणि अस्वस्थ झालो. साहजिकच मुलाचा विचार करायला लागलो आणि ४ महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला...... हुश्श... बर्‍याच दिवसांनी एका कार्यक्रमाचं निवेदन करून नुकताच घरी निघालोय..... शेवटचा कार्यक्रम केला होता २००४ साली... म्हणजे ९ वर्षं झाली की.... गुड मॅन....... चांगला झाला...... असं ७० - ८० प्रेक्षकांसमोर बोलणं नेहेमीच आवडतं. कलाकाराला प्रोत्साहन मिळण्याइतक्या टाळ्याही मिळतात आणि एक निवेदक म्हणून प्रेक्षकांशी संवाद पण साधता येतो.

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 29/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी ह

डोंबिवली डाटाबेस.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 26/10/2013 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे. बर्‍याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर? त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल. त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु. सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.