Skip to main content

प्रकटन

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 09/10/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.

एक अंकी नाटक "तेरी मेरी यारी तो....."

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 08/10/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवेश : पहिला ठिकाण : सर्व सामान्य घर वार शनिवार, वेळ रात्रीचे ८, सव्वा ८ नायक आपला स्वथ पणे संगणकावर काम करत आहे.म्हणजे काम करायचे नाटक वठवत आहे.ऑफीसमध्ये पण असेच करत असल्याने त्याचे हे नाटक उत्तमपणे वठत पण आहे.(नाटकात अजून एक नाटक.लेखक इंग्रजी सिनेमे जास्त बघतो, त्याचा हा परीणाम आहे.)...एव्हढ्यात मोबाइलची घंटी वाजली.. (हो हो घंटीच... नायकाच्या मोबाईलची रिंग टोन आहे ती.."नायकाचे अज्जुन पण भूत काळाची घट्ट नाते आहे" असे नाटककार इथे सांगत आहे, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आले असेलच.) नायक : (आधी नांव बघून) अबे साले तु है किधर.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 08/10/2013 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ ऑक्टोबर २०१३ . . तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला....

माझी फिल्म …

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 08/10/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
यस आय'म द चेंज नामक एका राष्ट्रीय फिल्म समारोहासाठी माझा "Dreams Matter" हा लघुपट निवडला गेला होता आणि आज तो मुंबई मध्ये दाखविला गेला. विषय दिल्यावर १०१ तासात फिल्म बनवायची आणि तीही पाच मिनिटा पेक्षा कमी वेळाची अशी बंधने होती. मला विषय दिला होता : People with Special Needs. इथे फिल्म दिली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संकल्पना, संपादन, चित्रीकरण मी एकट्यानेच केले.

हे राम...!!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/10/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वाजत आलेले अन हापिसातल्या निम्म्या अर्ध्या स्टाफला बाहेरचे वेध लागलेले. अशा कातरवेळी काळेनाना क्लार्क केबिनमध्ये घुसले अन घुटमळत उभे राहिले. ‘का हो, नाना ?’ मी ऑफिसचा चार्ज घेऊन जेमतेम एक महिना झालेला. तेवढ्यात नानांच्या भिडस्त स्वभावाचा मला बराचसा अंदाज आलेला. ‘मॅडम..डिविजन वरून फोन आला होता...’ ‘हं, काय ?’ ‘ते..उद्या गांधी जयंती ना ?’ ‘हो. मग ?’ ‘नाही, म्हणतात सकाळी सातला ऑफिसात झेंडावंदन करा..’ ‘गांधीजयंतीला झेंडावंदन ? आणि सकाळी सातला ?’ बापरे, सकाळी उठलं कि पळत सुटावं लागणार ! शिवाय सकाळच्या प्राणायामाला फाटा द्यावा लागणार, ते वेगळंच... मी मनात विचार केला. नाना गंभीर.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - २ (निर्मात्याबद्दल थोडेसे)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 03/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग- १ इंटरनेटचे जनक - प्रो. लिओनार्ड क्लाईनरॉक s मॉडर्न इंटरनेटचे जनक म्हणून ज्यांचा सगळ्यात आधी उल्लेख करता येईल अशी व्यक्ति म्हणजे प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक. जगाला ही अद्वितीय देणगी देणा-या क्लाईनरॉक यांचा जन्म १३ जून, १९३४ रोजी न्यूयॉर्क शहरात एका ज्यू कुटूंबात झाला.

हिरा २

लेखक साऊ यांनी गुरुवार, 03/10/2013 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
आणि मग, कुतुहल जागृत झालेली मी प्रत्येक तपशिल एखादा निसटता संदर्भ शोधायला लागले. आऊ ज्या घरात रहायची ते तिच सासर होतं. दोन भाऊ आणि एक म्हातारी आई. आऊची सासु ही आऊची सख्खी आत्या! आऊच्या भाषेत तिच्या सख्ख्या आत्यान तिचा गळा कापला होता! मामेआते भावंडाची लग्नं काही फार जगावेगळी नाही आहेत. तसच आऊला वयाच्या १२-१३व्या वर्षी लग्न करुन आणल गेल. नावासारखाच 'दगड' असलेल्या तिच्या मोठ्या आतेभावाला पुरुषाचे कपडे घालुन त्याच नसलेल पुरुषपण सिद्ध केल गेल.

हिरा १

लेखक साऊ यांनी बुधवार, 02/10/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
दुपट्यातल्या तिला, पाळण्यात घालताना काय विचार करुन तिचं नाव ठेवल गेल असेल देव जाणे, पण त्या नावासारखे तिला अनेक पैलु होते, हे मात्र खरं आणि तो प्रत्येक पैलु पडताना होणार्‍या वेदनाही होत्या. कधीतरी धुसर बाळपणात, पप्पांच्या माग लागुन शेतावर जाताना, पप्पांनी मध्येच गल्लित थांबुन "हिराबाई, जरा ताईंना बोलवा" अस हाकारलं आणि त्या दगडी जोत्याच्या घरातुन 'आऊ' बाहेर आली. तेंव्हा मी तिला फारस निरखलं नसाव, कारण आठवतय ते फक्त तिच्या अंधार्‍या घरातल्या खिडकीत बसुन खाल्लेला गुळ अन त्या चुलीच्या प्रकाशात चमकणारी तिच्या नाकातली मोरनी! "या आऊ!" अस पप्पा तिला थोडस आदराने बोलवत.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - १ (इंटरनेटचा उदय)

लेखक नानबा यांनी मंगळवार, 01/10/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट.. गेल्या काही वर्षांत बहुधा सर्वात जास्त वापरलं गेलेलं आणि बोललं गेलेलं प्रकरण. इंटरनेटशी जोडला न गेलेला माणूस आणि डोंबिवली ते सीएसटी रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या अनोळखी स्त्रीसोबत एक अक्षरही न बोलणारी स्त्री सापडणं निव्वळ अशक्य. इंटरनेट ने जग जवळ आणलं म्हणतात ते खोटं नाही. पूर्वी घरातला कोणी परदेशी गेला, की त्याच्या फ़ोनची वाट पाहत रात्री उशीरा पर्यंत जागं राहणं, आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डाची वाट पाहणं इ इ. प्रकार या पठ्ठ्याने बघता बघता नाहीसे केले.