Skip to main content

प्रकटन

फ्लर्टींग इंग्लीश स्टाईल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 19/07/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आ़ज पार पिट्ट्या पडला. " हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?" नेमकी शर्मिला ची दांडी. "नविन लग्न" सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास. "वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स." आता हे काय नविन. टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप. " उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते.

उंदरांची शर्यत

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 18/07/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव.

सर्वे आणि व्यवस्था

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 15/07/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापुर्वी एका सर्व्हेमधे सर्वेयर म्हणुन भाग घेतला. माझ्या जवळची व्यक्ती सर्व्हे ऑफिसर म्हणून काम करत होती. त्याबाबतची माझी काही विस्कळीत निरिक्षणे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे चालवल्या जाणार्‍या वसतिगृहांचा सर्व्हे. वसतिगृहातल्या सोयी सुविधा कशा आहेत? त्या पुरेशा आहेत का? हे जाणून घेण्यासाठी साधारण पाच-सहा पानी प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेतले जास्तीत जास्त प्रश्न हे बहुपर्यायी तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडावे ही अपेक्षा. याप्रकारचा एक सर्व्हे काही वर्षांपूर्वी झाला होता.

बारीक

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 15/07/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारीक गेला. उणेपुरे ३२ वर्षे म्हणजे काही जाण्याचे वय नव्हते तरी गेला. दुपारी साडेतीन ला मीत्याच्याशी बोललो आणि साडेपाचला बारीक गेलाही होता. त्याच्या जाण्याचे दु:ख आहेच पण याचे जास्त दु:ख आहे की जगातुन एका चांगल्या माणसाने कायमची एक्झिट घेतली. वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात आणि कोणाच्या अध्यातमध्यात नसणारा एक सामान्य माणूस २ तासात इहलोक सोडतो.

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 12/07/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
दाय विल बी डन! Jejus जिझस _____________________________ जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही. लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो).

माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 09/07/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली..

स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )

लेखक मदनबाण यांनी रविवार, 07/07/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो. मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच...

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 01/07/2013 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण आणि अर्जुनाकडे महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणून पाहू नका. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, सदैव उपस्थित असलेल्या दोन चित्तदशा आहेत. अर्जुन ही संभ्रमित चित्तदशा आहे आणि कृष्ण ही शांत आणि स्थिर स्थिती आहे. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे, मनाकडे आहे त्यामुळे अस्वास्थ्य आहे. krishna रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.