Skip to main content

प्रकटन

आपला जल्मोजल्मी ऋणी आहे

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 14/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो . मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण .

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

मामाचं गाव (आजोबा)

लेखक दशानन यांनी सोमवार, 13/05/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे.

रंगोली

लेखक सचिन कुलकर्णी यांनी रविवार, 12/05/2013 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी दूरदर्शनवर रंगोली नेमाने बघायचो. तेव्हा केबल TV हा प्रकार अस्तित्वात नव्हता. नंतर तो कार्यक्रम रटाळ व्हायला लागला (छायागीत आणि चित्रगीत प्रमाणेच). आणि दरम्यान केबल TV चे आगमन झाले. केबलचे आगमन झाल्यावर रविवारचे रंगोली पूर्णपणे सुटले.. (एक अरसे बाद ) ऐन (गद्धे) पंचविशीत माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. गर्लफ्रेंड का काय म्हणतात तशी. त्यांच्या घरी केबल नव्हते. ती रंगोली नेमाने बघायची आणि तिचा तो favorite कार्यक्रम होता. (तोवर गुणवत्ता परत सुधारली होती कार्यक्रमाची - चांगली गाणी, आपकी फर्माईष,वैगेरे). तिच्या नादाने मी रंगोली परत बघायला लागलो.

मग पुन्हा सामसूम...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 09/05/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती? एकाकीपणा.. अगदी तासंतास...! आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं.. विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. ! नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं? ती द्योतक आहेत..

कार्यकर्ते येती घरा...

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 09/05/2013 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली.

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 07/05/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग...

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/05/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर.. अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे.. माधुरी ६८ सालची.

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

थोडे मर्मबंधातील ...

लेखक ढालगज भवानी यांनी सोमवार, 06/05/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर थोडा बायकी विषयच. मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय. आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते.