Skip to main content

प्रकटन

आम्हा घरी धन..

लेखक मोदक यांनी रविवार, 26/05/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत.

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

लेखक दशानन यांनी गुरुवार, 23/05/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची. मैं तैनू फ़िर मिलांगी कित्थे ?

डोंबिवली कट्टा...भाग २....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 20/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच. वेळ : संध्याकाळी ७:३० स्थळ : नंदी पॅलेस कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात. खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल. प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या.. १. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते) २.

बालक पालक आणि मी

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 17/05/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हे दोन प्रकारचे असतात...!! एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात. तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात. शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!! .............मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती.

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 17/05/2013 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो.

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 15/05/2013 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव.

एक प्रेम दोन प्रेम तीन प्रेम चार!

लेखक इनिगोय यांनी बुधवार, 15/05/2013 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं. याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा. . ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे.