Skip to main content

प्रकटन

तो हसत होता

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 27/03/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो. आजूबाजूला अगदी तुरळक वावर होता. चुकूनच एखादा माझ्यासारखा वाटसरू दिसत होता. जसा जसा उशीर होत होता तसा माझ्या पावलांचा वेग वाढत होता. मोठ्या स्तंभाला मागे टाकून मी आता परावर्तीत तळ्याच्या काठावर आलो होतो. तळ्यामध्ये एका बाजूने स्तंभाचे तर दुसर्या बाजूने इमारतीचे प्रतिबिंब पडले होते.

राजेश सातमकर

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/03/2013 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर. १९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही.

आणखी एक टायटॅनिक-३

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 26/03/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२

लेखक साऊ यांनी रविवार, 24/03/2013 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच. तर पुढे तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा.

सेन्टी मेन्टी : जखम आणि खपली

लेखक मन यांनी शनिवार, 23/03/2013 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो. तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते. वेदनेचा आणि तीव्र दु:खाचा तो क्षण मागे सरु लागतो.

भूल-भुलैया

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 21/03/2013 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
भूल-भुलैया चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो. सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता.

दुनिया गोल आहे...

लेखक धन्या यांनी बुधवार, 20/03/2013 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
"आ रहा हैं क्या इंटरव्ह्यू लेने? टेलिफोनिक हैं." त्याने मीटींग रुमचा दरवाजा उघडताना मला विचारलं. तो मला साडे चार पाच वर्षांनी सिनियर. त्याची माझी ओळख फक्त एक दिवसाची. अगदी कालचीच. मी त्याला हो म्हटलं. साहेबांनी उमेदवाराला कॉल केला. समोरचा पठठया पोचलेला निघाला. "इटस थ्री ट्वेंटी. आय हॅड आस्कड युअर एचार टू शेज्युल माय इंटरव्ह्यू एनीटाईम बीफोर थ्री. नाऊ आय अ‍ॅम इन ओडीसी. आय कान्ट गो अहेड विथ धिस इंटरव्ह्यू.". समोरच्या पठठयाने त्याची वेळ न पाळल्यामुळे आम्हाला निकालात काढले होते.

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

शित्याची खोड

लेखक नरेश_ यांनी मंगळवार, 19/03/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
शित्याशेट ज्याम दिवस गावातनं गायप झाल्ता.कुनाला कय खबर ना पता. नाय म्हनाल आशिला सांगला व्हता क मामासकरं जातू म्हनून! शित्याशेट म्हनजे सिताराम म्हात्रे- हा तोच तो. एक नं. झोलर मानुस.मागं पन आपल्याला तो भेटलावता.