Skip to main content

प्रकटन

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

नूतन - एक सुंदर स्वप्न.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 21/02/2013 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला.

कालचा दिवस....

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 20/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही. बर्‍याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अ‍ॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल.

त्रागा धागा... वैताग.....

लेखक मन यांनी मंगळवार, 19/02/2013 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

समुद्रावरील पहिला दिवस-पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/02/2013 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा करा- . आज मुलुंड येथील स्वर झंकार चा तिसरा दिवस होता त्यात श्री जय तीर्थ मावुंडी यांचे अप्रतिम गायन आणि पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन वीणा वादन होते म्हणून पहिला भाग घाईघाईत लिहून अर्धवट सोडल्याबद्दल. असो अवोमिनची गोळी तोंडात धरली होती थोडा वेळ आडवा पडून होतो. थोड्या वेळाने पोटात ढवळणे थांबले परंतु डोके गरगरतच होते. पण थोडेसे धैर्य दाखवून मी उठलो आणि परत जिना चढून ब्रिज वर गेलो. वरून दिसणारे दृश्य भयंकर होते. जहाज पूर्ण तिन्ही मितीत ४५ अंशात डोलत होते समुद्र खवळलेलाच होता. पाणी लाटा आणि फेसामुळे पांढरे दिसत होते. तेवढ्यात तेथील रडार वर काहीतरी दिसले असे त्याचा ऑपरेटर सांगत होता.

माझी ऑफीसची डायरी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 17/02/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
५ जुन २०१० शनिवार १६:३० माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्‍यापैकी वर्दळ असणारार्‍या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे ) माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती . अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्यासारखे वाटले...

समुद्रावरील पहिला दिवस

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/02/2013 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
१९८९ च्या पावसाळ्यातील (जूनमधील) हि गोष्ट आहे. मी इंटर्नशिप संपवून कुलाब्याच्या नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात काम करीत होतो आणि जवळच कमांड मेस मध्ये राहत होतो. रुग्णालयाचे कामाची वेळ सकाळी ७.३० ते १३.३० अशी असे तेंव्हा मला सकाळी ६.३० ला उठण्याची गरज पडे. एकेदिवशी पहाटे ०५.३० वाजता माझ्या खोलीवर टकटक झाले. पहिले तर एक नौसैनिक माझ्यासाठी एक बिनतारी संदेश घेऊन उभा होता.

उत्क्रांती मोबाईलची- मोटोरोला.

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकत्याच टाकलेल्या उत्क्रांती-मोबाईलची या विषयाची माहिती घेत असताना एक लक्षात आलं की हा विषय फार खोलात जाऊन वाचण्यासारखा आणि रंजक आहे. म्हणून म्हटलं थोडं अजून लिहावं. आधीच्या धाग्यात generalised मोबाईलची उत्क्रांती लिहीली होती. या धाग्यापासून एकेका ब्रँडचा उदय कसा झाला, कुठून सुरूवात करून आज कुठल्या पदावर तो ब्रँड आहे यावर लिहावं म्हणतोय. वाचक सांभाळून घेतीलच. धाग्याव्यतिरिक्त जास्तीची माहिती कुणाकडे असल्यास वाचायला नक्की आवडेल. :) तर मोबाईलचा पहिला हँडसेट ज्यांनी काढला त्या मोटोरोला पासूनच सुरूवात करूया.