सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
प्रिय मन्नूस,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व.
आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी मला माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.
मिसळपाव