Skip to main content

प्रकटन

काळी पिवळी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/12/2012 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२) ’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’ मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही.

मिपाकरांच्या गाठी भेटी

लेखक रुमानी यांनी रविवार, 23/12/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो , बरयाच दिवसापासून आपणाशी संवाद साधण्याची सुप्त इच्छा होतिच. पण काही धाडस झाले नाही .पण झाले असेकी आठ दिवसा पूर्वी काही मिपाकर औरंगाबाद येथे येणार असल्याचे आपले मिपाकर मित्र प्रा .डॉ दिलीप बिरुटे ह्यांच्या कडून समजले . तेव्हाच ठरवले कि काही झाले तरी त्या सर्वांची भेट घ्यायची.

निवृत्त

लेखक शैलेंद्रसिंह यांनी शनिवार, 22/12/2012 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात] पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे. [सगळे अवाक, हे काय भलतंच] पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना? [पत्रकारांची होकारात्मक शांतता] पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे.

मनातलं जनांसाठी

लेखक समयांत यांनी बुधवार, 19/12/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
एच आर वाले म्हणवणारे सध्या कॉल करुन उमेदवार्‍यांना आशा लावत आपली मक्तेदारी गाजवत आहेत. खरेतर त्यांना सद्य परिस्थिती सांगता का येत नाही, प्लेसमेंटची साठेबाजारी करत मंदीची पळमात्र शंका येऊ न देणारे हे भविष्यातले गुन्हेगार आहेत, पण काय त्यांची आत्ताची रोजीरोटी त्या साठेबाजारीतूनच चालत असते. आज गोजिरवाण्या शहरात राहणारे आणि आपली ख्यालीखुशाली सांभाळणारे दारांत उभ्या माणसांना हलके हसून बोळवण करायलाही विसरले आहेत, इथेच ती मंदी वर डोके काढत आहे. मला जाचणारे बरेच काही आहे, पण इथे लिहावे कि नाही याचा विचार करतो आहे. असो, या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..

आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 15/12/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
गाणी वाजवायला शिकताना काही साधीसोपी पण एकदम मूड बदलून टाकणारी गाणी सतत मन वेधून घेत राहिली. या गाण्यात फार काही उच्च नाही पण त्यांच्या साधेपणामुळेच ती गुणगुणाविशी वाटतात. कामात सुद्धा ती बॅकग्राउंडला चालू असतील तर वातावरण लाईट राहतं. पूर्वी मोठ्या स्टुडिओजमधे चित्रपट निर्मितीची वेगवेगळी कामं एकाच ठिकाणी चाललेली असायची. एकदा एक दिग्गज निर्माता स्टुडिओत फेरफटका मारत होता. तो गाण्याच्या रेकॉर्डिंग रूमपाशी थबकला. एक नामचीन संगीतकार तितक्याच प्रतिभावंत गायिकेला गाण्याची चाल बर्‍याच वेळेपासनं समजावून देत होता. निर्मात्यानं त्याला विचारलं `भाई बात क्या है? इतनी देर क्यों लग रही है गाना बिठानेमे?

सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या आठवणी

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 14/12/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या काही खास आठवणी असतात. आभासी जगतात भटकत असतांना ह्या भन्नाट विषयावर वाचायला मिळाले. ह्या निमित्ताने माझ्या आठवणींना लागलेला पाझर मी येथे रिता करतो. भारतात सिनेमे आवडत नाही अथवा पाहत नाही असा माणूस विरळाच आपण सिनेमे पाहतो म्हणजे काय तर एकतर थेटर माफ करा मल्टिप्लेक्स.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 13/12/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम  वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ?  उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत.