Skip to main content

प्रकटन

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं.

जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी गुरुवार, 25/10/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
f सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर. विनम्र श्रद्धांजली.

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 23/10/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा. परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?" "माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात." "हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?" "जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये!

नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/10/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी. :) काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली.

आपण सारे झिंगु ....

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 14/10/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म निपाणीचा. आमचे मुळ गांव संकेश्वर. निपाणी जवळच. म्हंजे बेळगांव जिल्ह्यातच. शिक्षण निपाणीत. मोठा भाऊ इंजिनियरिंग पर्यंत सगळे शिक्षण निपाणी आणि बेळगाव मध्ये शिकला. तो आता पुण्यात असतो. लहान भाऊ दहावी पर्यंत कर्नाटकात शिकला. घरापासून पाच सात किलोमीटरवर महाराष्ट्राची हद्द सुरु होते त्या अर्जुनी गावाजवळ महाराष्ट्रातले कॉलेज आहे. तिथे त्याने अकराव्वी बारावी केली. पुढे सांगली आणि पुणे. आता तो बंगळूरू मध्ये स्थाईक. मी सातवी पर्यंत कर्नाटकातल्या शाळेत. मित्र अर्जुनीच्या म्हंजे महाराष्ट्रातल्या शाळेत गेले म्हणुन तिथे गेलो. पुढे इंजीयारिंग महाराष्ट्रात.

लवकरच एका सुर्याचा अस्त...!

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 13/10/2012 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
'I don't think I have plenty of cricket left in me'--सचिन तेंडुलकर हि बातमी वाचली आणि डोळ्यात टचकन पाणी आले... सचिन...सगळ्यांचा "तेंड्ल्या" आपल्याला काही दिवसानंतर कधीच त्या खेळतट्टी दिसणार नाही, या विचरानेच मन बैचेन झाले. क्रिकेट ते पण तेंडल्या शिवाय विचार ही करवत नाही. त्याची २३ वर्षांची कारकिर्द डोळ्या समोर आली... १६ वर्षांचा असताना न घाबरता "वसिम अक्रम, वकार युनुस सारख्या बॉलरला सामोरा गेलेला... ते आत्ता मागच्या वर्षी वल्ड्-कप जिंकल्यावर पळत येउन युवराजला मिठी मारणारा सचिन... सामना चालु असताना...सचिन आउट झाला तर आपण टि.वी बंद करायचो...

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.