Skip to main content

प्रकटन

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.

अति सर्वत्र वर्ज्ययेत....

लेखक Pearl यांनी मंगळवार, 04/09/2012 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
( अति सर्वत्र वर्ज्ययेत.... याबद्दल जे काही विस्कळीत विचार मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू. द्या. घ्या.) आपल्या संस्कृत भाषेत फार छान छान कोट्स आणि सुंदर अर्थपूर्ण अशी सुभाषिते आहेत. त्यातलं 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' हे वाक्य पण फार छान आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये. अति राग, अति लोभ, अति काटकसर, अति द्वेष, अति चिंता ..... अशी कोणतीच गोष्ट अति करू नये. एवढचं काय तर अति प्रेम(आंधळं प्रेम), अति काळजीही करू नये. अति चिंता: चिंतेबद्दल तर काय सांगावं. असं म्हणतातच ना की चिता मनुष्याला मेल्यानंतर जाळते, तर चिंता जिवंतपणी जाळते.

माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 03/09/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती. त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता--

दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

लेखक पैसा यांनी रविवार, 02/09/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे. मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे. दै.

व्हतास सारथी म्हणोनी

लेखक ज्ञानराम यांनी रविवार, 02/09/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
व्हतास सारथी म्हणोनी.... व्हतास सारथी म्हणोनी , माझ्या दारीया फुलेली ,येलं जाई-जुई भारी, तुळशीला अंगणात कशी आलीया उभारी, रंग रांगोळीचा ठसा दिसं उठूनं पुढल्यादार,, पिक जोमानं वाढलं , कस नाचतं शिवार,,, देवा जाई-जुई वानी , येल बहरुदे संसार, तुळशीच्या सत्वापरी , मी लाभूदे या घरी, रंग रंगात दिसूदे रं , मज पती श्रीहरि नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी मज ठाऊक नाही देवा, तुझी भक्ती तूच करशी आम्ही लेकरं तुझी रं , किती पोटं तूच भरशी.. मी लावते दिवा जरी , सुर्य तेजाच तुझ रुपं संसाराला हात तुझा , निर्गुण ब्रम्ह तु स्वरुप , मज आसक्ती नको रं, खेळ सारा हा कर्तव्याचा ओं
Taxonomy upgrade extras

अतर्क्य???

लेखक जिन्क्स यांनी शनिवार, 01/09/2012 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
'लोकांना आलेले अतर्क्य अनुभव' ह्या विषयावर ह्याच्या आधी हि बरेच लेख आणि चर्चा वाचलेले आहेत. अशा लेखांची ह्या आधी मी खिल्ली हि उडवली आहे, पण अशा प्रकाराची एखादी गोष्ट आपल्या सोबत घडते तेव्हा परिस्थिती पूर्णं पने वेगळी असते. असाच काहीसा मला आलेला अनुभव मी इथे देत आहे. आपण मोटरसायकल वर लडाखला जावं अस मला फार दिवसांपासून वाटत होत. सुट्टी पासून पैश्याची जमवाजमव पर्यंत बऱ्याचं अडचणी आल्या. प्रबळ इच्छे च्या जोरावर ह्या सगळ्या अडचणी वर मात करत पुण्यातून आम्ही १२ जण ह्या मोहिमेवर निघालो. पुण्यातून जम्मू पर्यंत रेल्वे नि जाऊन तिथून आमची 'बाइक एक्स्पेडिशन' सुरू होणार होती.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.