Skip to main content

प्रकटन

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/10/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले आता?”, कोणीतरी. “अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा. “काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर. “बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका. “आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर. “मग काय!

उर्ध्वश्रेणीचे (आंबट) वरण

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 03/10/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचा पंचवर्षीय वाढदिवस नुकताच साजरा झाला..... त्यानिमित्ताने अलिकडे उंबराचे फूल झालेल्या बर्‍याच लेखकांनी लेखनाची हौस पुरवून घेतली!!

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर

महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 02/10/2012 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light.

सहजच..१

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 29/09/2012 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या जिवनात कळत ऩकळत किती लहान मोठे प्रसंग अविरत घडत असतात. कधी ते आपल्याला हसवता,,राग आनतात , कधी दुखी करतात तर कधी उद्वीग्न कधी समधानी करतात . अशाच लहान मोठ्या प्रसंगांना कलमबद्ध करन्याचा एक प्रयत्न करत आहे , बघा आवडले तर अजुन लिहीन. हो तर सुरुवात घरी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगापासुन करु या , मी व सौ सहजच गप्पा मारत बसलो होतो आणि विशय निघाला नविन घराच्या बांधकामाचा , एक जागा दोन वर्शा पासुन घेवुन ठेवली आहे पन काम चालु करयला या ना त्या कारनाने उशीर होत आहे. बोलता बोलता बांधने बांधकाम सारखे शब्द वारवार येत होते .

सेन्टी मेन्टी : || You Bloody Civilian ||

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 25/09/2012 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : पात्रांच्या आणि प्रसंगाच्या अनूषंगाने शिव्या आणि ईग्रंजी शब्दांचा वापर करण्याची मुभा लेखकाने घेतली आहे, संपादक मंडळ, मालक त्याच्या शी सहमत असतील च असे नाही.हा निर्णय पुर्णतः माझा आहे.