Skip to main content

प्रकटन

नो प्रोब्लेम ...

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 03/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक प्रोब्लेम्ला उत्तर हे असताच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा हवा असतो तर कधी मानसं . या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो ....वपुर्झा ..व . पु . काळे यांनी काही वर्षांपूर्वी या ओळी लिहिल्या आणि प्रोब्लेम्स कडे पाहायचा आपला नजरीयाच बदलून गेला. त्या आधीचा माझं जगणं म्हणजे ' बाहर है प्रोब्लेम घरमे है प्रोब्लेम ...आगे पीछे आजू बाजू प्रोब्लेम हि प्रोब्लेम ' असे होते. मला आठवतंय लहानपणी शाळेत असताना गणित हा विषय म्हणजे माझं शत्रू नंबर वन . उदाहरण संग्रह सोडवून तयार ठेवणे हा माझ्या समोरचा मोठा प्रोब्लेम असे.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.

मदतीची हाक

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी बुधवार, 01/08/2012 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमटे यांनी आदिवासीं करिता सुरु केलेल्या आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली येथील प्रकल्पावर नविन डेअरी चे शेड तयार झाले आहे.....जवळपास १५ गाई राहू शकतील एवढे मोठे शेड आहे.....आता नविन गाई घ्यायच्या आहेत....आर्थिक मदत हवी आहे....चांगली गाय ४५ ते ५० हजार रुपयाला मिळते....मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा.... aniketamte@gmail.com

आद्य आंदोलक- गोदाईवा

लेखक खेडूत यांनी रविवार, 29/07/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे. असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल.. इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती. सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ.

डॉक्टर डॉक्टर

लेखक आनंद भातखंडे यांनी गुरुवार, 26/07/2012 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

लाईफ हिस्टोग्राम

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 25/07/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ हिस्टोग्राम " how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो .