Skip to main content

प्रकटन

वरदान (कथा)

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 29/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले.

नेमक काय कराल?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 28/06/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद. हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला. आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश. हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता. परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम पुण्यात पोचला. मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही. पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही. ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी

प्रणाम अनाम वीरांना...

लेखक सुधांशुनूलकर यांनी गुरुवार, 28/06/2012 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्‍‍यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही.

किंकर सेन्सेई

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 26/06/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना 'गाठ' पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते.

शाळेतील संम्मेलन..

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/06/2012 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060) वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते. मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.

साबू-हॉलीवूड गाजवणारा भारतीय अभिनेता

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 24/06/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न. २७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू.

३१ ते १३० पैकी कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी काढा!!

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 23/06/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आता या भागात ३१ ते १३० यापैकी कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी कसा काढावा हे बघू.यासाठी गरज आहे १ ते ३० या संख्यांचे वर्ग आणि काही पाढे तोंडपाठ असायची गरज आहे.या पध्दतींचा वापर करून अक्षरश: २ ते ५ सेकंदात ३१ ते १३० पैकी कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढता येईल. १ ते ३० या संख्यांचे वर्ग अनुक्रमे: १,४,९,१६,२५,३६,४९,६४,१००,१२१,१४४,१६९,१९६,२२५,२५६,२८९,३२४,३६१,४००,४४१,४८४,५२९,५७६,६२५,६७६,७२९,७८४,८४१ आणि ९००. १. जर संख्या ७० ते १०० दरम्यान असेल तर: समजा ९६ चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. १०० आणि ९६ मध्ये फरक आहे ४ चा. तेव्हा ९६ मधून तेवढेच (४) वजा करा.

प्रार्थना

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 22/06/2012 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती. " किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो!