Skip to main content

प्रकटन

देह

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 07/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू या लेखावर बरीच चर्चा झाल्यानं हा लेख इथे देतोय.

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

मृत्यु

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 04/06/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु. जीवनातील एक सत्य. कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही.

...... तेथे तुझी मी वाट पहातो!

लेखक प्रास यांनी सोमवार, 04/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनंतर जाणं झालं. तिथेच जिथे दोन दादरांची भेट होते. तिथे पोहोचल्यावर मनात लगेच तुझं गुणगुणणं गुंजन घालू लागलं. तू म्हणायचीस, "जिथे दादरा दादर मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते," आणि तसंच कानात शिरल्यासारखं वाटलं त्यानंतरचं तुझं खळाळतं हसू. किती दिवस होतील आता ते हसणं ऐकून. कल्पना नाही. शेवटचं ते ऐकल्यालाही बहुदा खूप कॅलेंडरं मागे जावं लागेल. तू असंच सांगायचीस आणि मी माझ्या सवयीप्रमाणे तू सांगितलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच जाऊन उभा असायचो. तुला ते माहितही असायचं. म्हणून मग बर्‍याचदा तू उशीराची वेळ सांगायचीस मला.

इंटरव्हेन्शन

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 02/06/2012 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात.

वेगळे आवाज

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 30/05/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'. तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते.