एका गाण्याची गोष्ट
रॉन फेअर आता काहीसा दडपणाखाली येऊ लागला होता. म्हंटलं तर तो तसा काही दडपण घेणारा माणूस नव्हता, नव्हे त्याची वृत्तीच तशी नव्हती. रॉन एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ध्वनि-मुद्रण अभियंता होता. संगीताची दुनिया, त्याने अगदी लहानपणापासून पाहिलेली. त्याच्या आजोबांनी राहत्या गावात एक छोटेखानी रेडियो स्टेशनच सुरू केलेलं. वयाच्या दोन अडीच वर्षाचा असल्यापासून रॉन मायक्रोफोनच्या अवती भवती गाणी गात खेळत असे. त्याची संगीतामधली आवड त्याच्या पालकांनी चांगली जोपासली. त्याच्यासाठी उत्तमोत्तम संगीत शिक्षक नेमून त्यांनी त्याच्या संगीत विषयक जाणीवा रुंदावल्या होत्या.
मिसळपाव