Skip to main content

प्रकटन

मेहदी हसन यांना श्रद्धांजली!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 13/06/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली! या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा! माझ्याकडून हे... सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ***

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

शोध तुकारामाचा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 11/06/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत.

या, या चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बनवा एक नवीन चित्र...

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 10/06/2012 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या अलिकडल्या एका धाग्यातील एका प्रतिसादात ५० फक्त यांनी म्हटले: .... आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील..... ही कल्पना खरोखर फारच छान आहे. खालील चित्राशी मनसोक्त खेळा, आणि बघा यातून नवीन काय होउ शकते:

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

भिकार शिणेमे आणि त्यांचे निष्टावंत प्रेक्षक

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 07/06/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
@जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं तुमच्यासारखी अनेक तरुण ह्या सिनेमांचे प्रमुख ग्राहक आहेत.( म्हणजे निर्मात्याच्या पैसा वसूल होण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे ) बोर झाल्यावर आजूबाजूच्या जमावाला क दर्जाचे लेहून आपण मिपावर लिहितो बहुदा ह्या एका निकषावर स्वतःला उच्च अ दर्जाचे समजायचे. व मग रावडी राठोड सारखा शिणेमा रीतसर पहायचा. मग आमच्यावर उपकार केल्याच्या थाटात तो शिणेमा किती म्हणजे किती वाईट आहे. ह्याबद्दल समीक्षा करायची. तुम्ही तुमच्या सारखे अनेक जण कार्यालयात पकतात.

नैतिकता

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 07/06/2012 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
नैतिकता. स्वतःच्या वागण्यावर स्वतःच घालुन घेतलेले किंवा अमुक गोष्ट अशीच केली पाहीजे अशा अर्थाचा समाजाचा आग्रह. सध्या आपण समाजाच्या आग्रहाचा विचार न करता फक्त स्वतःच स्वतःवर घालुन घेतलेल्या बंधनाबद्द्ल बोलु. अमुक एक गोष्ट करणे अथवा न करणे माझ्या तत्वात बसते असे आपण सांगतो. हे नक्की काय असते? तर आपण आपल्या बुद्धीनुसार अमुक एक पद्धतीने वागण्याचे ठरवतो. तसे वागणे हे आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते. त्या तत्वाविरुद्ध आचरण करण्याची कल्पना आपल्याला सहन होत नाही. तसे वागणे हे आपल्याला अनेकदा अनैतिक वाटते.

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.