Skip to main content

प्रकटन

माझे ह्या वर्षीचे संकल्प

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 08/01/2013 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं क] संकल्प केले जातात. संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो. जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात.

जळ.लि..

लेखक गवि यांनी सोमवार, 07/01/2013 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का? तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का? तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का? तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.

बुद्ध

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 07/01/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो. मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला...

Catch 22

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 06/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हरन्याला पुलिस नी पकडुन नेलं ना बाप्पा.." कालू वरडत वरडतच येत व्हता. "का म्हुन?" बाप्पाच्या चेहऱ्यावर माशीही उडाली नाही. "ते काल नक्सलीनी मारलं व्हतं ना पुलिसले...हरन्या नक्सली हाये म्हनत व्हते" "नक्सली? हरन्या? काय येडबीड लागले का बे पुलिसले?" "कोनीतरी पायजे ना बाप्पा....रिकॉर्ड ले.. हरन्या वावरात गेला व्हता रात्री...धरला ना मग त्याले रस्त्यात...जंगल म्हुन वावराचा रस्ता हाये...तर तिथेच धरला पुलिसने..." "साली आपली तर जिदंगानीच खराब हाये साली...तिथे नक्सली इथे पुलिस..." "जाव दे...रोजचाच हाये..." "हा..

तो आणि ती

लेखक शैलेंद्रसिंह यांनी गुरुवार, 03/01/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
तिला पक्कं माहित होतं की तो भोळसट आहे. जगातल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करणारा असा तो...त्याच्या आयुष्यात आपलं स्थान तरी काय याची तिला खात्री नाही....त्याच्या आजुबाजुला वावरणारे सगळेच त्याच्या जवळचे भासतात...मग आपणंही त्याच गर्दीतले एक तर नाही ना असं तिला सारखं वाटायचं. कोणालाही दुखावू नये हेच त्याचं तत्व....त्याला भेटणारा प्रत्येक स्त्री-प्ररुष/आबालवृद्ध यांच्याशी जणु त्याचे जन्मांतरीचे नाते असल्यागत आपुलकिने विचारपुस हा करतो...भावनाविवश होऊन काहितरी बोलतो...काही आश्वासनं देतो..पण मग ती आश्वासनं पाळतो ही...त्यासाठी पुढचा-मागचा काहीही विचार करत नाही.

अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 01/01/2013 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती! -----------------------------------------------------------------------------
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय.

अवसान, हिंमत, धाडस एक गोष्ट

लेखक मन यांनी मंगळवार, 01/01/2013 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट. जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले. नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले.

स्वप्नातल्या देशा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/01/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.

निरोपाचा क्षण

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 31/12/2012 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको. आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव.

एक अध्यात्मिक संवाद

लेखक धन्या यांनी रविवार, 30/12/2012 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो. "किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्‍याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे." "अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्‍याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं.