Skip to main content

प्रकटन

शाळा - दहावी.

लेखक तर्री यांनी रविवार, 03/02/2013 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
10th ची exam declare झाली. आयुष्यातला beautiful period खल्लास. Fundoo मजा केली शाळेत. बंटीची बॉडी उतरली, तरी बरे बंटीने ९ वीत सिगारेट सोडली. मला पण जाम कंटाळा येतो आजकाल सिगरेटचा. पमी कधी कधी कंपनी देते, पण ली भित्री आहे, चोरून चोरून ओढते. पमी पहिली टायगरची compass होती. त्यानेच तिला सिगरेट ओढायला लावले. साला तिला घेवून सिनेमेक्स ला morning show जायचा. टायगर च्या बापूची transfer झाली , कोण म्हणतो uncle ला हाकलले. तो साला पाहिजे होता १० वीत. टायगरला रोबर्टपण घाबरायचा. Science period ला रोज पमी ला घेवून बसायचा बाजूला. कधी कायपण बोलला नाय रोबर्ट त्याला. तशी पमी सहावीतच upgrade झाली होती.

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 02/02/2013 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे.

'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 02/02/2013 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दुस्थानातला विख्यात अभिनेता 'कमल हसन' याचा 'विश्वरूपम' चित्रपट अखेर काही ठिकाणी प्रदर्शित झाला येण्यापूर्वीच वादात अडकल्याने सर्वत्र त्याच्याबद्दल उत्सुकताही होती. अनेकदा हे वाद खरे मानायचे की प्रसिद्धीच्या क्लूप्त्या मानायच्या असा प्रश्न पडतो ? जमानाच तसा आलाय. एक नक्की हा चित्रपट २०१३ चा हिट्ट चित्रपट ठरणार असे दिसते त्याच्याबाबत जे वाद निर्माण झाले त्याबाबत सर्वांनी फक्त अंदाज व्यक्त केलेत नेमकं कुणीच काही बोलत नाही. 'विश्वरूपम' या नावामुळे काही वेगळ्याच कल्पना मनात येतात. पण ज्या लोकांनी विरोध केला आहे त्यावरून असे मानायला जागा आहे की विदेशी संस्कॄतीबद्दल काही भाष्य असावे ज्याच्य

स्वामिनी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 01/02/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं. तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.

पॅलेस रॉयल - उच्चभ्रू मुंबईचा नवा चेहरा..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 31/01/2013 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षांपासून भारताचा चेहरामोहराच पार बदलत चाललाय. श्रीमंतीचे बेफाट वारे वाहायला लागलेत. (आता हे वारे कुठून कुठे, आणि कुठल्या भागात कसे वाहतायत हे मी "वेगळं" सांगायला नकोच.) तरी याच श्रीमंतीच्या विश्वातला मैलाचा दगड सध्या मुंबईच्या वरळी भागात उभा राहतोय. त्याचं नाव "पॅलेस रॉयल". सध्या एका प्रोजेक्टसाठी कान्साई नेरोलॅक च्या हेड ऑफिसला लोअर परेल ला जावं लागतंय. तिकडेच पहिल्यांदा गेल्यावर या पॅलेस महाशयांचं दर्शन झालं. लोअर परेल वरून वरळी नाक्याकडे जाणार्‍या गणपतराव कदम मार्गावर श्री राम मिलच्या जागेवर सध्या ही वास्तू आकार घेत आहे.

मराठा लाईट इन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 31/01/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire आपल्याला आठवत असेल मी मिपावर काही दिवसापूर्वी मराठा लाईट इन्फंट्रीवर एक छोटी लेखमालिका लिहिली होती. ती आता पूर्ण करुन पुस्तक स्वरुपात पूर्ण प्रकाशीत झाली आहे. हे पुस्तक मिपावरील व माझ्या ब्लॉग वाचकांच्या प्रोत्साहनपर शब्दांमुळेच पूर्ण झाले आहे याची मला जाणीव आहे.

मुक्ताजोबा...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 31/01/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावर नीलकांतचा लेख वाचला (माझे आजोबा - एक आठवण) आणि न राहवून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहे. लेख जिने लिहिलाय ती माझी शाळेतली मैत्रीण, हल्लीच परत नव्याने सापडलेली. तिच्या परवानगीनेच तिचे खरे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर, हा लेख इथे प्रसिद्ध करतोय. त्यामुळे कॉपीराईटची समस्या होणार नाही याची खात्री बाळगावी.

अक्षम्य हेळसांड (दुर्लक्ष्) CRIMINAL NEGLIGENCE

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 31/01/2013 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी विशाखापटणम येथे कल्याणी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट (१९९८) आहे. आमचा एक पंजाबी lab technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) होता. त्याच्या बायकोने एका मतीमंद मुलाला १९९० मध्ये पंजाबातील गावात जन्म दिला आणि त्यात तिचे दुर्दैवाने देहावसान झाले.त्याचे वय तेंव्हा २४ वर्षे होते त्या तंत्रज्ञाने नंतर या मुलाची देखभाल करण्यासाठी आणि परत पुढील आयुष्यासाठी दुसरे लग्न केले.दुसऱ्या बायकोपासून त्याला दोन मुले झाली. ही दोन्ही मुले व्यवस्थित होती. हे मतीमंद मूल जसे वाढू लागले तसे तसे त्याच्या अविकसित मेंदूचे कार्य अनियमित होऊ लागले. आणि त्याला अपस्माराचे(fits) झटके येऊ लागले.

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

माझे आजोबा - एक आठवण

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 31/01/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारीला दुपारी मामांचा फोन आला. ते म्हणाले की आजोबा (आईचे वडील) तुझी आठवण काढत होते, भेटून जा ! आजोबा गेले काही महिने वृद्धापकाळानुसार तब्येतीच्या तक्रारीने सारखे, दवाखाना व घर अश्या स्वरूपात होते. पण मला आजोबांनी 'का आणि कशासाठी' बोलावले याची कल्पना नक्कीच होती. आजोबांना भेटायला जायला ४ जानेवारीची तारीख निघाली. ६ तारखेला लहान बहिणीच्या लग्नाची गडबड असल्यामुळे उशीर झाला होता. आजोबांना भेटायला आयसीयूत गेलो तर काळजात धक्कं झालं.