Skip to main content

प्रकटन

फिर काहे दर्द जगाओ

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 18/03/2013 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस. पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे.. तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे. आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे. हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर? त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे. पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..? कसं रोखावं आता ह्याला?

नौदलातील आयुष्य -१

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/03/2013 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी १९८७ साली एम बी बी एस पास होऊन नौदलात कमिशन मिळवून मुंबईच्या नौदलाच्या रुग्णालयात इंटर्न शिप साठी कामावर रुजू झालो. तेथे २ वर्षे काम १ वर्ष इंटर्न शिप आणि १ वर्ष वैद्यकीय अधिकारी (सर्जन लेफ्टनंट) म्हणून काम करून जानेवारी १९९० मध्ये विक्रांत या विमानवाहू जहाजावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. विक्रांत तेंव्हा दुरुस्ती साठी कोरड्या गोदीत ( dry dock) होती. त्याचे पूर्ण दुरुस्तीकरण चालू होते.

कोकणातील शिमगोत्सव

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 17/03/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा ! कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात. कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे .

दुल्हेराजा....

लेखक मन यांनी शनिवार, 16/03/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा. . दुल्हेराजा म्हणजे गोविंदा -रविना नायक - नायिका असा लक्षात राहण्यापेक्षाही चटकन आठवेल तो कादर खान- गोविंदा ह्यांची जुगलबंदी म्हणूनच.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

अद्भुत भाग ३

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
8 तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

लेखक लिलि काळे यांनी शनिवार, 09/03/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.

फोन वापरताना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/03/2013 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो. ते टाळण्या साठी एक साधी युक्ती. १..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक) . २.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन )

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

लेखक सुज्ञ माणुस यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट ---------------------------------------------- फोटो चा काय पंगा होतोय इथे कळत नाहीये. फोटो नाही दिसले तर हि लिंक उघडा : http://sagarshivade07.blogspot.in ------------------------------------------------ शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते. गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला.

लाल पेरू

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 06/03/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
लाल पेरू "अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो. पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे.