Skip to main content

प्रकटन

श्रद्धांजली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 30/01/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
. नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... श्रद्धांजली!

मैफिलीतले प्राणी - एक अभ्यास

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 27/01/2013 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे. तुम्हाला मैफिलींना जाण्यासाठी वेळ आणि संधी आहे. पण त्या मैफिलीचा आनंद तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकणार आहात, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गायक, राग, ध्वनिव्यवस्था वगैरे वगैरे. अजून एक महत्त्वाचा घटक त्यात आहे - तुमचा शेजारी. मैफिलीत तुमच्या शेजारी बसणारा इसम. मैफिली ऐकण्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मला अनेक शेजारी लाभले. म्हणजे काही 'लाभले' आणि काही 'भोगावे लागले'. त्यांच्या जातकुळ्याही लक्षात यायला लागल्या. मैफलप्रेमी मिपाकरांसाठी हे "रेडी रेकनर". १.

नामांतर

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 25/01/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
n सर्व मिपाकरांना नमस्कार. सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.

आज नेताजी सुभाष जयंती

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/01/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.

माझ्या कुतुहलाची दीनगाथा!

लेखक आनन्दिता यांनी मंगळवार, 22/01/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो...

सुनिता

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 22/01/2013 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर.

नानाचा अग्रलेख.....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 20/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!! ......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं.

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.